ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप नवेगाव(पेठ)च्या वतीने माजी आमदार मितेशजी भांगडिया तथा अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडिया यांच्या वाढदिवस निमित्त उदंड आयुष्यासाठी महाआरती

लिंगोबा देवस्थान येथे महाआरतीसह गरीब गरजूना ब्लॅंकेट वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

    चिमूर येथील भूमिपुत्र तथा विधानपरिषदचे माजी आमदार मितेशजी भांगडिया व अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडिया यांच्या वाढदिवस दिनांक ८डिसेंबर ला असून भाजप नवेगाव (पेठ )च्या वतीने लिंगोबा देवस्थान येथे महा आरती करून माजी आमदार मितेश जी भांगडिया यांच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडे घालून सामाजिक उपक्रमच्या माध्यमातून गरीब गरजूना ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न झाला.

    गरीब गरजूना ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम प्रसंगी राजुभाऊ देवतळे म्हणाले की *माजी आमदार मितेशजी भांगडिया जी* हे सामाजिक दायित्व समजून सामाजिक कार्य करीत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव आमदार बंटीभाऊ भांगडिया सुद्धा आपल्या मतदार संघात राजकारण सोबत सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहे. रंजल्या गांजल्या लोकांच्या मदतीसाठी व शिक्षण, आरोग्य क्षेत्रात सुद्धा भरीव करीत आहे तसेच मतदार संघाच्या विकासासाठी सतत झटत आहे.तेव्हा माजी आमदार मितेशजी भांगडिया व अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडिया यांच्या उदंड आयुष्यासाठी उदंड आयुष्य सुखमय राहील यासाठी महाआरती व पूजा करून वाढदिवस निमित्त दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

   तसेच नवेगाव पेठ येथील गरजू लोकांना भाजपा नवेगाव पेठ कडून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

   या प्रसंगी मनीष तुंम्पलीवार, दिगंबर खलोरे, रमेश कंचर्लावार यांनी शुभेच्छा दिल्या.

    या कार्यक्रम प्रसंगी भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पलीवार,जेष्ठ नेते दिगंबर खलोरे,भाजयुमो तालुका अध्यक्ष बालू पिसे,गुलाब राव मनमोकर,युवा नेते कुणाल कावरे, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई ननावरे भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, रमेश कंचर्लावार, सौ छाया कंचर्ला वार, रवी नन्नावरे राजू बोडने, सरपंच गजानन गुडढे, विलास कोराम, सूरज नरुले, बादल बडगे, अजय शिरभैय्ये, दिलीप नलोडे,राकेश देवतळे प्रणय देवतळे अनु भोपे पुरानिक रोकडे देविदास रोकडे वासुदेव श्रीरामे, प्रशांत नरोले, गजानन चवरे, घनश्याम नागोसे, सुधाकर राजूरकर, श्रीराम झाडे, उत्तम रोकडे विनोद भुजाडे, कणिराम सातपुते, नीलकंठ रोकडे, बालाजी केमये, श्रीराम सातपुते, बाबू राव रोकडे, लक्षमन सोयाम, काशीराम राजूरकर तथा बूथ प्रमुख रितेश झाडे तसेच बूथ कमिटी पदाधिकारी गावकरी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थिताना महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. जय घोषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये