ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा-गोंदिया रेल्वेला झाडी-एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे

पहिल्या महिला साहित्य संमेलनात तीन ठराव पारित

चांदा ब्लास्ट

झाडीबोलीच्या उत्थानासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : हंसराजभैय्या अहिर

पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे सूप वाजले

               चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया व या चार जिल्ह्याचा सीमाभाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जात असून या भागात चालणारी चांदा-गोंदिया रेल्वेला झाडी एक्सप्रेस नाव देण्यात यावे यासह झाडीबोलीतील साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, गोंडवाना विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झाडीबोली अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे असे महत्वपुर्ण तीन ठराव झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मुल यांच्या वतीने पहिल्यांदाच पार पडलेल्या पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनात राष्ट्रमाता जिजाऊ नगरी बालविकास प्राथमिक शाळा मुल येथे घेण्यात आले.

या संमेलनात उदघाटनप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करीत झाडीबोलीच्या उत्थानासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून भाषिक दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

     संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे व स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर यांचे उपस्थितीत दिवसभर ग्रंथदिंडी, कवायत, लेझीम, रांगोळी, वेशभूषा, स्वागतनृत्य, झाडीगौरव,पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण,परिसंवाद व कविसंमेलन पार पडली. वैविध्यपूर्ण या संमेलनात राज्यभरातून साहित्यिकांनी सहभाग घेऊन अनेकांची मने जिंकली या संमेलनाने साहित्य क्षेत्रात महिलांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध करून दाखवले.

      संमेलनाच्या दिवसभरातील रेलचेल मूल नगरवासीयांसाठी कौतुकाचा विषय ठरला. आदरातिथ्य आणि सांस्कृतिक वलय लाभलेल्या या संमेलनाचा समारोप संमेनाध्यक्ष शशिकला गावतुरे यांच्या मनोगतात भारावून निघाला. यावेळी स्वागताध्यक्ष रत्नमालाताई भोयर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,प्रभाकरराव भोयर, अभिलाषा गावतुरे,सुनीता बूटे, नंदुभाऊ रणदिवे, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत समर्थ, कैलास चलाख,विजय लोनबले, युवराज चावरे, प्रवीण मोहूर्ले, सुखदेव चौथाले, अरुण झगडकर, लक्ष्मण खोब्रागडे, वृंदा पगडपल्लीवार, सुनील बावणे, प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे, वर्षा भांडारकर, गणेश मांडवकर, विजय लाडेकर, नामदेव पीजदूरकर, स्मिता बांडगे,परमानंद जेंगठे, प्रशांत भंडारे, रामकृष्ण चनकापुरे, सुनील पोटे, रुपेश मारकवार,चित्रपट निर्माते आशुतोष साधमवार, नामदेव गावतुरे, प्रशांत गावतुरे आदी मान्यवर व साहित्यरसिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये