ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सेंट अन्स हायस्कूल अव्वल

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावतीचे आयोजन

चांदा ब्लास्ट=

अतुल कोल्हे भद्रावती :-
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने शहरातील मॅक्रम स्कूल अकादमी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत शहरातील सुंमठाणा येथील सेंट अँड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले.
सदर विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या प्रतिकृती सादर केल्या होत्या. सेंड अँड हायस्कूलच्या संस्कार सोमेश्वर उपरे व सम्राट कांबळे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्मार्ट वीज प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच सक्षम गणेश बदखल या विद्यार्थ्याने सादर केलेल्या प्रतिकृतीला आदिवासी गटातून प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. या वेळी शाळेच्या मुख्याधिका सिस्टर ग्रेसी थॉमस तथा शिक्षकांनी सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असुन सर्वत्र शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये