मोहबोडी येथे काकड आरतीची परंपरा कायम
टाळ मृदंगाच्या तालावर भाविक तल्लीन
चांदा ब्लास्ट
कुकडहेटी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोहबोडी येथील हनुमान मंदिरात काकड आरती सेवा समिती व गुरुदेव भजन मंडळाच्या वतीने काकड आरती रोज पहाटेला नित्यनेमाने सुरू आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे नित्यनेमाने आरती करून भजन, कीर्तन, गवळण आदी आरत्या व स्त्रोते म्हटले जातात. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण भागातील मंदिरात देखील पहाटेला काकड आरतीचा मधुर सूर निनादतो.
हनुमान मंदिर मोहबोडी येथे काकड आरती मध्ये टाळ, तबला व मृदंगाच्या तालावर भजने सादर होतात. येथील गुरुदेव सेवा भजन मंडळ व काकड आरती सेवा समिती आणि अन्य धार्मिक भावनेच्या नागरिक व युवकांनी पहाटेच्या समयी उठून स्थान उरकवून काकड आरतीला जातात. मोहबडी येथील काकड आरतीला या पिढीतील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घेतांना दिसून येत आहे हे विशेष.
मोहबोडी येथील काकड आरतीची परंपरा मागील अनेक वर्षापासून कायम आहे. सर्वप्रथम काकड आरतीची सुरुवात स्वर्गीय विनायकजी आत्राम, गिरमाजी लेनगुरे, तुकाराम मोहुर्ले यांच्या टीमने सुरुवात केली. तरी आजच्या घडीला गुरुदेव भजन मंडळ व काकड आरती सेवा समितीय सामाजिक कार्यकर्ते ही परंपरा कायम ठेवली आहे. काकड आरती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी काकड आरती सेवा समितीचे अध्यक्ष गजानन मोहुर्ले, गिरमाजी लेनगुरे, संभाजी मोहुर्ले, दुमाजी जेंगठे, बंडू मोहुर्ले, अनिल कन्नाके, संजय मोहुर्ले, सुधीर मोहुर्ले, गणेश कन्नाके, दीपक मोहुर्ले, नितेश आत्राम, दिनकर लेनगुरे आदी धार्मिक भावनेचे पुरुष व युवक सहकार्य करीत आहेत.