Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती व भजनाचे आयोजन..

महोत्सव समितीचे विश्वस्त शास्त्रकार परिवाराला महाआरतीचा मान

चांदा ब्लास्ट

          श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती, भजन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे विश्वस्त राजेंद्र शास्त्रकार यांना महाआरतीचा मान मिळाला. यावेळी श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, समीतीचे सचिव अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त मिलिंद गंपावार, श्याम धोपटे, आशा महाकाले, अर्चना शास्त्रकार, डॉ. अशोक वासलवार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रेरणा कोलते, विश्वास माधमशेट्टीवार, रोडमल गहलोत, अमोल शेंडे, राशेद हुसैन, करण बैस, धीरज देठे, हरीश ससनकर, रतन शीलावार, चंद्रशेखर देशमुख, देवा कुंटा यांच्यासह महोत्सव समीतीच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली ची महती संपूर्ण राज्यभरात पोहचावी पर्यायाने येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने चंद्रपूर येथे श्री माता महाकाली महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. यंदा सदर महोत्सवाच्या दुस-या दिवशीही माता महाकालीच्या भक्तांचा मोठा सहभाग लाभला. आता श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने वर्षभर विविध धार्मीक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर नियोजनानुसार महिण्यातून एकदा माता महाकाली मंदिर येथे, महाआरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्याचे नियोजन समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.

          दरम्यान मंगळवारी येथे महाआरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गुरुसाई भजन मंडळाच्या संचाने भजन सादर केले. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे विश्वस्त राजु शास्त्रकार यांनी सहपरिवार श्री माता महाकालीची आरती केली. यावेळी शास्त्रकार परिवारा तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेकडो नागरिकांनी महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये