वर्धा पथकाकडुन पो.स्टे. वर्धा शहर येथे दाखल मोबाईल चोरीच्या गुन्हयातील आरोपीस उत्तरप्रदेश येथुन ताब्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २४/०३/२०२५ रोजी फिर्यादी नामे गौरव बाबाराव सेलुकर रा. गणेश नगर, वर्धा यांचेक कच्ची लाईन, झेंडा चौक, वर्धा येथे असलेले गौरव सेल्स नावाचे मोबाईल दुकानाचे शेटरला लावलेले लॉक तोडुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील नविन मोबाईल चौरी गेल्या बाबत पो.स्टे. वर्धा शहर येथे अप. क्र. ४९४/२५ कलम ३०५, ३३१ (४) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयात तांत्रीक माहीतीचे आधारे आरोपी नाव ईमरान ऊर्फ डबला वल्द नजीर खान रा. मिर्जी फाटा (तिलक) ता. नानपारा जि. बहराइच (उत्तर प्रदेश) १ निष्पन्न झाल्याने आरोपी नामे ईमरान ऊर्फ डबला वल्द नजीर खान यास त्याचे राहता पत्ता मिर्जी फाटा (तिलक) ता. नानपारा जि. बहराइच (उत्तर प्रदेश) येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरीचे एकुण ०७ मोबाईल व रोख रक्कम असा एकुण जुमला किंमत १,०२,८००/-रु. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, सलाम कुरेशी, पो.हवा. नरेंद्र पाराशर, सचिन इंगोले, पिंटु पिसे, राजेश तिवस्कर, ना.पो. नितीन इटकरे, रामकिशन ईप्पर, पो.अं. संघसेन कांबळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.