ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राणी अग्नीहोत्री विद्यालय, पवनूर येथील विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतींतर्गत सायबर गुन्ह्याबाबत माहिती देवुन मार्गदर्शन

स्वराज्य-मित्र सामाजिक संस्था, मोरांगणा यांचेतर्फे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्वराज्य-मित्र सामाजिक संस्था, मोरांगणा हे आर्वी तालुक्यातील 25 आदिवासी बहुल भागातील विमुक्त ग्रामीण जमातीतील मुलांसोबत शिक्षण व संरक्षण या विषयावर काम करतात. सदर संस्थेकडुन दिनांक ०३.०८.२०२३ रोजी राणी अग्नीहोत्री विद्यालय, पवनूर येथील विद्यार्थ्यांन सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करणे करिता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मार्गदर्शन शिबीरामध्ये सायबर शाखेतील श्री. विशाल मडावी, श्री. अंकित जिभेव श्रीमती स्मिता महाजन यांनी मोबाईल, फेसबूक, व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वत:ला सुरक्षीत ठेवणे संबंधाने विद्यार्थांना माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करुन इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच सद्याच्या युगात विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन जडले असल्याचे लक्षात येत असल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलचे फायदे व मोबाईल पासुन होणारे दुष्परीणाम याबाबत माहिती देण्यात आली. गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे

सदर कार्यक्रमास राणी अग्नीहोत्री विद्यालय, पवनूर येथील प्राचार्य श्री. प्रदिप गोमासे व शिक्षक वृंद तसेच स्वराज्य-मित्र सामाजिक संस्था, मोरांगणा सचिव श्री. राहुल बैस, तसचे कार्यकर्ते विष्णु वऱ्हाडे, भारती बोकडे व 70 विद्यार्थी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये