ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भजन स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आवाळपुर इथे 14 नोव्हेंबर ला भजन स्पर्धा घेण्यात आली. भजन स्पर्धेमध्ये माऊली भजन मंडळाच्या शशीकला राजुरकर, इठा मांडे, मालन एकोणकार, सुनिता निब्रड, सिंदु दोरकडे, सुनंदा ढवळे, मंगला चौधरी, माया चटप कलावती कडुकर, रेखा टोंगे चंद्रकला कन्नाके, नागोबा बोरकर यांनी सहभाग घेतला.

  भजन स्पर्धेला तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता धोटे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य दरवर्षी करण्यात येत असुन विविध कार्यक्रम बचत गट मेळावा, महीला मेळावा, वृध्द पेन्शन योजना, राज्यस्तरीय साहित्य संमेलन व कविसंमेलन घेण्यात येत असते. राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, महीला दिन, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती, दरवर्षी साजरी करण्यात येते.

ग्रामस्वच्छता अभियान, शिवनक्लास, ब्युटीपार्लर, गरजू लोकांना मदत संस्थेच्या वतीने करण्यात येते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये