ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी यांची ग्रापंचायत हिरापूरला सदिच्छ भेट

ग्रामपंचायत अंतर्गत सर्व विकासकामांची केली पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

               येथून जवळस असलेल्या मौजा. हिरापूर या गावाला चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी मा.विवेक जॉन्सन यांनी नुकतेची भेट दिली.या भेटी दरम्यान गावात सुरु असलेल्या विकासकामांची त्यांनी पाहणी केली व कामाबद्दल आपले समाधान व्यक्त केले व ग्रामपंचायत हिरापूरच्या सरपंच सौ.प्रीती नितीन गोहणे व उपसरपंच श्री.शरद कन्नाके यांना शासनाच्या विविध योजना व विकासकामे सुरळीत पार पाडत असल्यामुळे शुभेच्छा दिल्या.

   हिरापूर ग्रामपंचायतीचे सचिव श्री.विपीन वाकडे यांची सी.ई.ओ साहेब यांनी खास प्रशंसा केली.त्यांनी हिरापूर ग्रामपंचायतीचे अभिलेख पूर्णपणे व्यवस्तीत तयार केले होते.अभिलेख अद्यावत असल्याचे दिसून आल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथे सुद्धा मुख्य कार्यपालन अधिकारी मा.विवेक जॉन्सन यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती समजावून घेतली. शिष्यवृती परीक्षा व नवोदय परीक्षा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी शिक्षकांनी करून घ्यावी व शालेय गुणवता वाढविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा अश्या सूचना त्यांनी उपस्थित शिक्षकांना केल्या. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना त्यांनी गणित या विषयावर मार्गदर्शन केले

रिमझिम पाऊस येत असतानाही मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट उपस्थित लोकांना चटका लावून गेली, सदर भेटीदरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी मा.विवेक जॉन्सन यांच्या सोबत उपमुख्य कार्यपालन अधिकारी मा.श्री.कलोडे साहेब, संवर्ग विकास अधिकारी मा.मधुकर वासनिक, मा.जगन्नाथ तेलकपल्लीवार साहेब, गट शिक्षणाधिकारी मा.वैभव खंडारे, विस्तार अधिकारी प.स.सावली मा.राजू परसावार, अभियंता मा.मोहन खराटे, सरपंच सौ.प्रीती गोहने, उपसरपंच मा.शरद कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य सौ.निता मुनघाटे, क्रीष्णा राऊत, सचिव सुजित येरोजवार यावेळी उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ग्रामीण भागात भेट होने स्वागतार्थ आहे.यामुळे कामाला गती मिळण्यास मदत होते.अभिलेखे व्यवस्थित ठेवता येतात, वेळीच चुका लक्ष्यात येतात.अधिकाऱ्यांनी नियमित भेटी दिल्यास प्रशासन गतिमान होण्यास मदत होते.भविष्यकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटीचे नियोजन केल्यास ग्रामीण भागाचा विकास त्वरेने साधता येईल.

         सौ.प्रीती गोहणे, सरपंच, ग्रामपंचायत हिरापूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये