ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वरचित काव्य वाचन स्पर्धा संपन्न

विश्वशांती विद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचलित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे विद्यार्थ्यांच्या बालमनांना जागृत करण्यासाठी ‘स्वरचित काव्यवाचन’ स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक मिलिंद सुपले, प्रमुख उपस्थिती अशोक लंजेवार, रिंकी सुरमवार होते. स्वरचित काव्य वाचन स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली.

त्यामध्ये अ गटाचे प्रथम पारितोषिक कु. तेजस्विनी कुकुडकर या विद्यार्थिनीने पटकवले तर द्वितीय क्रमांक कु.अश्विनी गेडाम या विद्यार्थिनी मिळविला. ब गटाच्या स्पर्धेतून प्रथम क्रमांक पार्थ कन्नाके तर द्वितीय क्रमांक कु. निधी सुरमवार या विद्यार्थिनीला मिळाला. या स्पर्धेमध्ये दोन्ही गटात एकूण ३४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. नवनवीन बालगोपालांनी आपल्या बोबड्या बोलातील वाणीतून सुंदर अशा कविता सादर केल्या.

         अ गटाचे परीक्षक म्हणून डॉ.राजश्री मुस्तीलवार आणि चंदा पीसे यांनी केले, तर ब गटाचे परीक्षण वनिता गेडाम आणि उर्मिला बारेकर यांनी बघितले.याच कार्यक्रमात अशोक लांजेवार यांनी माहितीच्या अधिकारा संबंधिची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू केदार यांनी केले तर आभार संजोग आभारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये