ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांनी सादर केले नामांकन अर्ज

सावली तालुका अ गटातून संदीप गड्डमवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली : दिनांक १० जुलै २०२५ रोजी होऊ घातलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास ०५ जूनला सुरुवात झाली असून आज सावली तालुका अ गटातून मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक संदीप गड्डमवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्याच बरोबर बँकेचे विद्यमान संचालक संतोषसिंह रावत यांनी मुल तालुका अ गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यावेळी डॉ.सुरेश महाकुलकर,डॉ.किशोर जेणेकर,लक्ष्मण धोबे,मूल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरू गुरनूले, अवधुत कोटेवार आदी उपस्थित होते.संदीप गड्डमवार सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला असून याही वर्षी आपण विजय होऊ असा विश्वास व्यक्त केला.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया तब्बल १३ वर्ष थांबली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आजपर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे आणि आणि तो कायम ठेवण्याचा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू असून भाजप व इतर पक्षांनी सुद्धा सत्ता बदल करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये