ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अबब चक्क भद्रावती नगर परिषद कार्यालयातील साहित्याची जप्ती

जमिनीचा किराया न दिल्याने जमीनमालकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       आठवडी बाजारासाठी भाडेतत्वावर दिलेल्या खासगी जमिनीचा जवळपास ६६ लक्ष रुपये किराया जमिनमालकाला वेळोवेळी मागणी करुनही व योग्य संधी देऊनही चुकता न करण्यात आल्याने जमिनमालकाने याविषयी वरोरा न्यायालयात दाद मागीतली व केस जिंकली.त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या जप्तीच्या अधिकारानुसार जमिनमालकाने जप्तीची कारवाई करीत भाडे वसुलीसाठी नगर परिषद कार्यालयातील अनेक साहित्य जप्त केले.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करुन थकलेले भाडे वसुल करण्यात येईल असे जमिनमालकाकडुन सांगण्यात आले.आठवडी बाजारासाठी शहरातील राजु गुंडावार, संजय गुंडावार व किशोर गुंडावार यांची ३० हजार ०३३ फुट जमीन २०१८ मध्ये भद्रावती नगरपरिषदने ६६ हजार रुपये प्रतीमहिणा भाडेतत्वावर घेतली होती.प्रारंभी काही महिने भाडे चकते करण्यात आल्यानंतर नगरपरिषदेकडून पुढील भाडे थकीत करण्यात आले.थकीत भाड्याची जवळपास ६६ लक्ष एवढी रक्कम थकीत झाली.या रकमेची गुंडावार यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे अनेकदा मागणी केली व त्यासाठी पुरेशी संधिही दिली.

मात्र नगरपरिषदेतर्फे सदर रक्कम चुकती करण्यात न आल्याने गुंडावार यांनी याविरोधात वरोरा येथील दिवानी न्यायालयात खटला दाखल केला.या खटल्याचा निकाल न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजुने देत.रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार गुंडावर यांना दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार यांनी दिनांक ३० ला नगर परीषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई सुरु केली.या जप्ती अंतर्गत कार्यालयातील सोफा,खुर्च्या यासह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भद्रावती नगरपरिषदेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहे.

         नगर परीषदेजवळ एकरकमी रक्कम चुकती करण्यास पुरेसा पैसा नाही. ही रक्कम पाच टप्यांमधे चुकती करण्याचा प्रस्ताव गुंडावार यांना देण्यात आला. मात्र त्यांनी तो मान्य न करता जप्तीची कारवाई केली. 

         मुख्याधिकारी विशाखा शेळकी, भद्रावती नगर परिषद

     जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करुन भाड्याची रक्कम जप्त करण्यात येईल. वसुली पुर्ण न झाल्यास आणखी साहित्य जप्त करण्यात येईल. 

                     संजय गुंडावार, जमिनमालक

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये