Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपने कायमच ओबीसींना न्याय देण्याचे काम केले

ओबीसी जागर यात्रेत प्रदेश प्रभारी श्री. आशिष देशमुख यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट

देशाचे पहिले ओबीसी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने कायमच ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ओबीसी भाजपचा आणि भाजप ओबीसींचा’ हिच भूमिका भाजपने ठेवली आहे, असे प्रतिपादन करून ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी श्री. आशिष देशमुख यांनी भाजप कुठल्याही परिस्थितीत ओबीसींसोबत आहे, असा विश्वासही दिला. यावेळी त्यांनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूरचा सर्वांगीण विकास झाल्याचे गौरवोद्गारही काढले.

महाराष्ट्र भाजपच्या वतीने आयोजित ओबीसी जागर यात्रा आज चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड व मुल येथे पोहोचली. याठिकाणी भव्य सभा आयोजित करण्यात आली. यावेळी भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी श्री. आशिष देशमुख बोलत होते. यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजय गाते, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते श्री. चंदन सिंह चंदेल, माजी आमदार सुदर्शन निमकर ,श्री. कमलाकर घाटोडे, श्रीमती संध्याताई गुरनुले, प्रा. प्रकाश बघमारे, श्री. अविनाश पाल, सौ. अर्चनाताई डेहनकर, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. सोनटक्के, सौ. रेणुका दुधे श्री. प्रभाकर भोयर श्री. नामदेवराव डाहुले, श्री. चंदू मारगोनवार, सौ. रत्नमाला भोयर, श्री. आशिष देवतळे, श्री. संतोष तंगडपल्लीवार, श्री. जितेंद्र सोनटक्के श्री प्रकाश गड्डमवार श्री कवींद्र रोहनकर यांची उपस्थिती होती.

श्री. आशिष देशमुख म्हणाले, ‘भाजपची भूमिका ओबीसींसोबत ठामपणे उभे राहण्याची आहे. याची प्रचिती गेल्या नऊ वर्षांमध्ये ओबीसी समाजाला आली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विविध योजनांचा लाभ ओबीसी समाजाला मिळवून दिला आहे. याशिवाय २०१४ मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर देशातील पहिले ओबीसी मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन केले. त्यासाठी दरवर्षी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे ओबीसी समाज आज आश्वस्त आहे.’ भाजपला देखील सातत्याने ओबीसींची ताकत मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. महात्मा गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीमधून सुरू झालेली ओबीसी जागर यात्रा विदर्भातील ४५ विधानसभा, ९ लोकसभा क्षेत्र तसेच १६०० गावांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. नंदू रणदिवे, श्री. सतीश बोम्मावार, श्री. दादाजी येरणे, श्री. चंद्रकांत आष्टनकर, श्री. अजय गोगुलवार, श्री. प्रशांत समर्थ, श्री. अनिल साखरकर, श्री. किशोर कापगते, श्री. प्रवीण मोहरले, श्री. युवराज चहारे, श्री. विनोद धोटे, श्री. संजय येनुरकर, श्री. किशोर वाकुडकर, श्री. विशाल करंडे, श्री. प्रशांत बोभाटे, श्री. निखिल सुरमवार, श्री. राकेश गोलेपल्लीवार, श्री. गौरव संतोषवार, श्री. दिलीप पाल, श्री. राकेश विरमलवार, श्री. आशुतोष सादमवार, श्री. प्रमोद कोकुलवार, श्री. प्रशांत कोहळे, श्री. महादेवराव नागपुरे, श्री. भिकाजी शेंडे, श्री. अनुप नेरलवार यांनी परीश्रम घेतले.

सभेचे संचालन श्री. महेंद्र करकडे व श्री कृष्णा राऊत यांनी केले. तर आभार श्री. राकेश ठाकरे व श्री. गुड्डू चिमूरकर यांनी मानले.

ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा चेहरा-मोहरा बदलला
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचा चौफेर विकास झाल्याचा श्री. आशिष देशमुख यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘सुधीरभाऊ आमच्यासाठी आदर्श आहेत. ते अर्थमंत्री असताना विदर्भाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज चंद्रपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळेच येऊ शकले. प्रत्येक घरापर्यंत आर्थिक समृद्धी पोहोचविण्याचे काम सुधीरभाऊंनी केले आहे. त्यांच्यामुळेच चंद्रपुरातील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिर व संसद इमारतीच्या उभारणीसाठी वापरले गेले. असे आमचे अष्टपैलू नेतृत्व आज लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यासाठी गेले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे,’ या शब्दांत श्री. आशिष देशमुख यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचा गौरव केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये