ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या शिक्षिका पत्नीने केली शासनाची फसवणूक – एकाचवेळी मिळविली दोन संस्थांसाठी शिक्षिका पदाची वैयक्तिक मान्यता

प्रशासकीय चौकशीत दोष सिध्द - गुन्हे दाखल करण्यास शिक्षणाधिकाऱ्यांची चालढकल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जिल्हा परिषद चंद्रपूर येथुन योगिता चरणदास शेडमाके नामक शिक्षिकेने दोन वेगवेगळ्या संस्थेतील नोकरीसाठी वैयक्तिक मान्यता पत्र मिळविल्याचे उघडकीस आले असुन सदर शिक्षिका माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे ह्यांची सुविद्य पत्नी आहे हे विशेष. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यवाह रामदास गिरटकर ह्यांनी सदर प्रकरण उघडकीस आणले असुन त्यांनी फेब्रुवारी 2022 मधे ह्यादांदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन शिक्षक आमदार ना गो गाणार ह्यांनीदेखिल यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना मार्च 2022 मधेच दाखल केली होती.

प्राप्त माहितीनुसार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व तत्कालीन जि प सदस्य संतोष कुमरे ह्यांच्या पत्नी योगिता चरणदास शेडमाके ह्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा ह्या संस्थेद्वारे संचालित कन्या माध्यमिक विद्यालय गोंडपिपरी येथे पुर्व माध्यमिक शिक्षिका म्हणुन विनाअनुदानित तुकडीवर 04/02/2013 पासुन मान्यता प्राप्त केली असुन शिक्षक हजेरीपटावर उपस्थिती आहे.

योगिता चरणदास शेडमाके ह्यांची शिवाजी हायस्कूल राजुरा येथे संस्थंतर्गत बदली करण्यात आल्यानंतर त्या 07/09/2014 रोजी भारमुक्त होऊन 08/09/2014 ते 18/05/2021 दरम्यान शिवाजी हायस्कूल राजुरा येथे सहा. शिक्षक पदावर विनाअनुदानित वर्ग 9 व 10 च्या वाढीव तुकडीवर कार्यरत होत्या व ह्या संदर्भात शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद चंद्रपूर ह्यांनी 28/02/2016 च्या पत्रान्वये 08/09/2015 पासुन मान्यता प्रदान केली आहे.

योगिता चरणदास शेडमाके ह्यांनी ह्याच कालावधीत म्हणजेच 20/07/2013 रोजी तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चांदा चंद्रपूर द्वारे संचालित श्री. प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा फाटा येथे सहा. शिक्षिका पदावर नियुक्त झाल्या असल्याचे नियुक्तीपत्र सदर शाळेने दिले असुन योगिता चरणदास शेडमाके ह्या 01/08/2013 रोजी शाळेत रुजु झाल्याचे रुजु प्रतिवेदनानुसार स्पष्ट होत आहे. श्री. प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा फाटा ह्या शाळेत योगिता चरणदास शेडमाके ह्यांच्या पदाला मान्यता दिल्याचे पत्र जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) ह्यांनी 12/12/2013 रोजी दिलेल्या पत्रानुसार 01/08/2013 पासुन त्यांच्या पदाला मान्यता देण्यात आली आहे.

वास्तविकतः एका संस्थेत कार्यरत असताना कायद्यानुसार दुसऱ्या ठिकाणी तत्सम अथवा इतर कुठल्याही पदावर नोकरी करता येत नाही मात्र योगिता चरणदास शेडमाके ह्या  04/02/2013 ते 19/05/2021 दरम्यान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनुक्रमे गोंडपिपरी व बदलीनंतर राजुरा येथील शाळेत कार्यरत होत्या. जवळपास ह्याच कालावधीत म्हणजेच 15/07/2013 पासुन त्या तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चांदा चंद्रपूर अंतर्गत श्री प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा फाटा येथेही नोकरीवर होत्या व ह्या दोन्ही ठिकाणच्या नोकरीसाठी त्यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) ह्यांचे कडून मान्यता प्राप्त केली होती. योगिता चरणदास शेडमाके ह्यांनी एकाच कालावधीत दोन संस्थेत शिक्षिकेची नोकरी करणे व त्यासाठी मान्यता पत्र मिळविणे बेकायदेशीर असल्याने हे प्रकरण मराशिप चे कार्यवाह रामदास गिरटकर ह्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली.

योगिता चरणदास शेडमाके ह्यांनी ह्यासदर्भात केलेल्या खुलाशात त्या श्री प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा फाटा येथे सकाळ पाळीत तर कन्या माध्यमिक विद्यालय गोंडपिपरी येथे दुपारच्या पाळीत कार्यरत असल्याचे आपल्या खुलाश्यात म्हंटले असले तरीही नांदा फाटा ते गोंडपिपरी हे अंतर जवळपास 75-80 किमीच्या दरम्यान असल्याने त्यांनी एव्हढा प्रवास करून वेळेत शाळेत पोहचणे व विद्यादान करणे अशक्य असल्याचे स्पष्ट होते. ह्याचाच अर्थ त्यांनी शासनाची फसवणूक केली असुनही त्यांनी  प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा फाटा ह्या शाळेतून 40 टक्के अनुदानावर मे 2022 पासुन वेतन घेतले हे विशेष.

योगिता चरणदास शेडमाके ह्यांना शिक्षणाधिकऱ्यांची मान्यता कशी मिळाली ह्याची सविस्तर माहिती वाचा लवकरच ………….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये