गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटारसायकल चोरी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पूलगाव, जि. वर्धा परिसरात वारंवार होत असलेल्या मोटारसायकल व मोपेड वाहनांच्या चोरी संबंधाने मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरी गेलेल्या मोटारसायकल वाहनांचा शोध घेण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते. चोरी गेलेल्या मोटारसायकल व अज्ञात आरोपीतांचा कसोशिने मुखबिर नेमून शोध घेणे सूरु असतांना सफौ. धात्रक यांचे पथकाला चोरीची मोटारसायकल विक्रीकरीता वर्धा परिसरातील दयालनगर रेल्वे स्टेशनचे गेटसमोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सदर परिसरात सापळा लावला असता दयालनगर परिसरात एक मोटारसायकल व त्यावर दोन इसम संशयीत मिळुन आले त्यांचे जवळ जावून त्यांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे १) कौशिक बिजेश तिवारी २) एक विधीसंर्घषीत बालक दोन्ही राहणारा भिमलाईन, पुलगाव असे सांगितले. त्यांचेजवळ संशीयीत मोटारसायकल मिळुन आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली तेव्हा त्यांना विश्वासात घेवून मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर मोटारसायकल ही पुलगाव परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. सदर मोटारसायकल बाबत पो.स्टे. पुलगाव येथे विचारपूस केली असता मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद असल्याचे समजल्याने त्यांना ताब्यात घेवून गुन्हयाचा समांतर तपास केला असता त्यांनी पुलगाव परिसरातून चार मोटारसायकल व तिन मोपेड गाडी चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांचेकडून चोरी केलेले सातही वाहने वेगवेगळ्या ठिकाणावरुन जप्त करण्यात आले असून चोरी केलेल्या वाहनांची विक्रीकरीता मदत करणारे १) राहूल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी व २) गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे यांना देखील विचारपूस करुन गुन्हयात ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन, पुलगाव येथे जप्त करण्यात आलेल्या वरिल चार मोटारसायकल व तिन मोपेड गाड़ी संबंधाने चोरीचे गुन्हे दाखल असून मोटारसायकल चोरीचे सातही गुन्हे उघडकीस आलेले आहेत. मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे..

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशानुसार सपोनि संतोष दरेकर, पोउपनि अमोल लगड, पोउपनि रामदास खोत, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा, विनोद कापसे, अक्षय राउत, शिवकुमार परदेशी, गणेश खेवले सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये