गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोखंडी पोल चोरी करणारी टोळी एलसीबीच्या जाळ्यात

एकुण 12 लाख 97 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          दि. 18/02/24 रोजी पो.स्टे. देवळी येथे किशोर इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. कंपनी हैद्राबाद तर्फे असिस्टंन्ट इंजिनिअर संदिप निखीतकर रा. एम.एस.सी.बी.कॉलनी वर्धा यांनी रिपोर्ट दिला कि, त्यांचे कंपनीतर्फे मौजा अडेगाव ते गिरोली रोडवरील पुलाजवळ गौळ फिडरचे काम सुरू असुन, त्याकरीता प्रत्येकी 9 मिटरचे 123 लोखंडी पोल तेथे ठेवुन होते, परंतु त्या पोलपैकी 25 पोल कि. 1,50,000 रू दिसून न आल्याने, ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने गॅस कटरच्या मदतीने कापून चोरून नेल्याचे त्यांना समजुन आले.

त्यावरून त्यांनी पो.स्टे. देवळी येथे चोरीबाबत रिपोर्ट दिल्यावरून अप क्र. 179/24 कलम 379 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्था.गु.शा. जि. वर्धा करीत होते.

  अशाच प्रकारे आणखी इतर पोलीस स्टेशन ला गुन्हे नोद असल्याने व सदर गुन्ह्याचा सुध्दा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा करीत असल्याने, गुन्ह्याचे गांभीर्य बघता, तपासाचे चक्रे फिरवीत स्था.गु.शा. जि. वर्धा चे पथक हे दि. 23/02/24 रोजी मौजा अडेगाव शिवारात सापळा रचुन थांबले असता, आरोपी नामे 1) सैफ अली मुख्त्यार अली सैय्यद रा. जाकि हुसेन कॉलनी वर्धा, 2) शेख सोहेल शेख सादिक कुरेशी रा. पुलफैल वर्धा हे त्यांचे आणखी दोन पसार साथीदारांसह बोलोरो पिकअप मालवाहु गाडीने कटर मशीन व इतर साहित्यासह आणखी लोखंडी पोल चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता, स्था.गु.शा. पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

त्यादरम्यान दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ताब्यातील दोन आरोपीतांना पोलीसांनी विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदारांसह केल्याचे कबुल केले असून, पो.स्टे. अल्लीपुर व कारंजा येथे आणखी चोरी केल्याचे सांगितल्याने, त्यांचे ताब्यातून चोरून नेलेले चोरीच्या मालाची वाहतुक करण्याकरीता वापरलेली आणखी एक टाटा 909 मालवाहु गाडी जप्त करण्यात आली.

तसेच चोरीचा माल विकत घेणारे 3) रॉबिन बशीर शेख रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट ह.मु. प्रगती नगर वर्धा, 4) शेख जाकिर शेख मेहबूब, रा. साईनगर म्हसाळा वर्धा यांना ताब्यात घेवून, त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  एकंदरीत तपासदरम्यान 04 आरोपीतांचे ताब्यातून, 1) विद्युत लोखंडी पोलाचे कट केलेले लहान-मोठे 149 तुकडे कि. 1,82,000 रू, 2) एक बोलेरो पिकअप मालवाहू गाडी क्र. एम.एच.32 ए.बी. 7252 कि. 4,00,000 रू, 3) एक टाटा 909 मालवाहु गाडी क्र. एम.एच. 31 सी.बी. 3766 कि. 7,00,000 रू, 4) गॅस कटर, जुळणी साहित्य, लोखंडी पाना, एक गॅस सिलेंडर, एक ऑक्सिजन सिलेंडर कि. 15,000 रू असा एकुण जु.किं. 12,97,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 04 आरोपीतांना अटक करून पो.स्टे. देवळी यांचे स्वाधीन करण्यात आले. इतर दोन फरार आरोपीतांचा शोध सुरू आहेत. अशा प्रकारे स्था.गु.शा. जि.वर्धा चे पथकाने पो.स्टे. देवळी, अल्लीपुर व कारंजा घा. येथील प्रत्येकी एक प्रमाणे 3 गुन्हे उघडकिस आणले असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे, स.पो.नी. संतोष दरेकर, पो.उप.नी. सलाम कुरेशी अमोल लगड,, शिवकुमार परदेशी, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. अरविंद येनुरकर, संजय बोगा, नरेंद्र पाराशर, पो.अं. संघसेन कांबळे,विनोद कापसे, अभिषेक नाईक, नितीन ईतकरे, मिथुन जिचकार, अनुप कावळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये