ताज्या घडामोडी

हंसराज अहिर ह्यांच्या प्रयत्नांनी अखेर शेतकऱ्यांना मिळाला न्याय – वेकोलिने जमिन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरू

कोलगाव व मानोली भागातील 374 हेक्टर जमिनीला सेक्शन 4 लागु

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुक्यातील कोलगाव व मानोली गावातील काही जमिनींना वेकोलीने अधिग्रहित करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला होता तसेच त्यांच्या नोकरीची प्रक्रियाही पूर्णत्वास येत आहे मात्र ह्यापैकी काही शेतजमिनीची अधिग्रहण प्रक्रिया वेकोलीने थांबविली होती. याविरोधात परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढा उभारला व आपल्या न्याय्य हक्कासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर ह्यांना मदतीसाठी साकडे घातले होते.

हंसराज अहिर ह्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा अभ्यास करून वेकोलिकडे पाठपुरावा सुरू केला अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असुन वेकोलीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कोलगाव येथिल 360 हेक्टर तर मानोली येथिल 14 हेक्टर अशी एकुण 374 हेक्टर शेतजमीन अधिग्रहित करण्याचे मान्य करून तिथे सेक्शन 4 लागु करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

मागणी मान्य झाल्याचा आनंद शेतकऱ्यांनी पेढे वाटुन साजरा केला सोबतच ह्या लढ्यात खंबीर साथ देऊन वेकोलीला मागण्या मान्य करायला लावल्याबद्दल हंसराज अहिर ह्यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार व्यक्त केले ह्यावेळी भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, जेष्ठ नेते मधुकर नरड, पुरुषोत्तम लांडे उपसरपंच, ॲड. इंजि. प्रशांत घरोटे, अक्षय निब्रड, आरती निब्रड, शंकर पासपुते, रमेश उरकुडे, रमेश लांडे, बालाजी काळे, जगदीश लांडे, राजू पिंपळकर, मनोज पिंपळकर, विनोद पोतराजे, सुभाष पिंपळकर संजय किंगरे, दिनेश वैरागडे, गोलू बोबडे, विकास दिवसे,जनार्दन देहरकर, सागर उरकुडे, रितेश लांडे, निखिल दिवसे, अमोल पेटकर, प्रशांत मोरे, सचिन वैद्य, सुनील दिवसे ह्यांचेसाह इतर शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये