ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिधाड (जटायु)हे स्वच्छता दूत असून त्यांचे पुनर्वसन करणे काळाची गरज

गिधाड(जटायू)पक्षांचे संवर्धन होण्यासाठी औषधांच्या विक्री बाबत दक्ष राहण्याबाबत

चांदा ब्लास्ट

   संपूर्ण भारतातून गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असतांना त्यांच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत,गिधाडे हे स्वच्छता दूत असून त्यांचे पुनर्वसन करणे काळाची गरज आहे हे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा.श्री अभिमन्यु काळे सर यांनी आज दिंनाक 09/02/2024 रोजी रामबाग फॉरेस्ट अतिथीगृहात केमिस्ट अध्यक्ष गोपाल एकरे व पदाधिकारी आणी केमिस्ट बांधव यांच्या सोबत सकाळी चर्चा केली
     नुकतेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात गिधाडे (जटायू)संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे,मा.आयुक्त श्री अभिमन्यु काळे सर यांनी सांगितले की या दुर्मीळ प्रजातीचा अभ्यास जेव्हा करण्यात आला तेव्हा असे निदर्शनास आले की देशात गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत असून येणाऱ्या काळात सदर गिधाडे दृष्टीस सुद्धा दिसणार नाही,त्यांची कमी होणारी संख्या ही चिंतेची बाब आहे,जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटझरी भागात तयार केलेल्या प्रिरिलीज एव्हीअरी मध्ये संशोधकांच्या देखरेखीत 10 गिधाडे ठेवण्यात आलेली आहे,सदर प्रकल्पातुन अतिधोकाग्रस्त असलेल्या निसर्गातील या स्वछता दूतांना हक्काचे अधिवास सुद्धा प्राप्त होईल,तसेच निसर्ग स्वच्छ ठेवण्यास मदत होईल व आपल्या जैवविविधतेमध्ये मोलाची भर पडेल
     राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री अभिमन्यु काळे सर यांनी गिधाडांच्या संख्येतील कमतरता ही चिंतेची बाब आहे असे विषद केले,गिधाड मृत प्राण्यांच्या मांसावर आपले जीवन यापन करीत असतो,परंतु त्या मृत प्राण्याने जर diclophenac/aceclophenac/ketorolac अश्या औषधांचे सेवन केलेले असेल तर त्यांच्या भक्षणाने गिधाडांचा किंव्हा पक्षांच्या किडनी वर विपरीत परिणाम होतो व त्यांचा मृत्यू होतो,या साठी केमिस्ट बांधवांनी diclophenac/aceclophenac/ketoprofen घटक द्रव्य असलेली औषधी जनावरांनसाठी विक्री करू नयेत तसेच मानवांना लागणारी कुठलीही औषधी जनावरांसाठी वापरली जाऊ नये असे दिशा-निर्देश दिलेत
        मा.आयुक्त श्री काळे सर यांनी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री मनिषजी चौधरी यांना निर्देश दिलेत की सदर औषधींच्या वापरावर तसेच विक्रीवर आपण लक्ष द्यावेत,श्री मनिषजी चौधरी यांनी समस्त केमिस्ट बांधवांना सदर औषध ही फक्त मानवांसाठी विक्री करावी असे आवाहन केले.
या अध्यक्ष गोपाल एकरे व पदाधिकारी आणी औषध विक्रेत्यानी जनावरासाठी बंदी असलेली औषध जनावरांसाठी विक्री होत नाही व याबाबत दक्षता घेण्यात येईलव पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले.
      सदर सभेला जिला संघटनेचे अध्यक्ष श्री गोपाल भाऊ   एकरे,सचीव विनोद बुद्धावार,ग्रामीण उपाध्यक्ष श्री रवी आसुटकर,सह-सचीव श्री अनुप वेगिणवार,pro श्री रतन भाऊ शिलावार,श्री कवेश सहारे,श्री अभिजित पोटे,श्री विनय सबनीस,सचीन सांबरे,श्री अनील काळे,श्री मिलिंद गंपावार,संजय रामावत,दिलीप चांडक,श्री दिनकर धोबे,श्री दत्तात्रय कंचरलावार,व केमिस्ट बांधव अगत्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये