ताज्या घडामोडी

संभाजी भिडे गुरुजी चंद्रपुरात – अग्रसेन भवन येथे कार्यकर्त्यांसह बैठक व उद्बोधन

व्याख्यानाला अनेक संघटनांचा विरोध - सभा उधळण्याच्या प्रयत्नातील कार्यकर्त्यांना केली अटक

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

छञपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक, गडकिल्ले संवर्धनासाठी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त म्हणून ओळखले जाणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी ह्यांचे आज रविवार दिनांक 23 जुलै रोजी चंद्रपूर शहरात जाहीर व्याख्यान, व कार्यकर्त्यांशी हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन तसेच खडा पहारा ह्या संदर्भात चर्चा व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन सकाळी 10:30 वाजता दाताळा मार्गावरील अग्रसेन भवन येथे त्यांचे आगमन झाले.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत आलेल्या व भिमा कोरेगाव दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे गुरुजी ह्यांचे व्याख्यान व संघटनेची बैठक चंद्रपूर येथे होऊ देणार नाही अशी भूमिका अनेक संघटनांनी घेतली असुन त्यांची सभा उधळण्याचा इशारा अनेक संघटनांनी दिला होता त्या अनुषंगाने संबंधित संघटनांचे शेकडो कार्यकर्ते अग्रसेन भवन जवळ सकाळपासूनच उपस्थित होते.

संभाजी भिडे गुरुजींच्या सभेला होणार विरोध लक्षात घेता अग्रसेन भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून विरोधी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे गुरुजी विरोधात घोषणाबाजी व विरोध प्रदर्शन सुरू केले. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये ह्यासाठी अखेरीस पोलीस प्रशासनाने उलगुलान संघटनेचे प्रमुख राजु झोडे हयांचेसह इतर संघटनांच्या शंभरावर कार्यकर्त्यांना अटक करून काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये