धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला तीन महिन्याचा कारावास
८४,२५२ /- रुपये दंड ठोठावला...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा- धनादेश अनादर झाल्याच्या प्रकरणात आरोपी नामें पुरुषोत्तम ताणबाजी भोयर वय 48 वर्ष राहणार सुकळी बाई याला तीन महिन्याची शिक्षा आणि ८४,२५२/- रुपयांचा नुकसान भरपाई दंडाची शिक्षा झाली. विदर्भ महिला रुरल क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वर्धा, रजी. नंबर 415 / 2013 या संस्थेकडून 50,000/- रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपीने संस्थेला 42,126/- रुपयाचा धनादेश दिला होता. परंतु तो धनादेश अनादरीत झाल्याने संस्थेने त्यांच्याविरुद्ध सेक्शन 138 NIA अंतर्गत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात कर्जसंबंधित सर्व दस्तऐवज संस्थेचे व्यवस्थापक वंदीश वानखेडे यांनी न्यायालयासमोर सादर केले.
सदर पुरावे ग्राह्य धरून माननीय न्यायाधीश ADDI. C J. M. वर्धा कोर्ट नंबर 5 श्रीमती अर्पणा कादियन यांनी सदर पुराव्याला ग्राहय धरून कलम 138 NIA 1881 VIDE S. 255 (2) CCP 1973 अंतर्गत आरोपीला दोषी ठरवून तीन महिन्यांचा कारावास आणि ८४,२५२/- रुपयाचा दंड ठोठावण्यात सुनावण्यात आलेला आहे सदर दंड रक्कम दिनांक 20/05/2026 पर्यंत फिर्यादी संस्थेला न दिल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा दिनांक 20/04/2026 रोजी सदर न्यायालयाने सुनावली. संस्थेतर्फे ॲड श्री एस आर तिवारी यांनी पैरवी काम पाहिले आहे…..



