ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी खामगाव येथे पत्रकारांसाठी चर्चासत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डिजिटल तंत्रज्ञान संधी आव्हाने आणि पत्रकारितेची नवी दिशा या विषयावर बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचे चर्चासत्र 3 ऑगस्ट रोजी खामगाव येथे प्रजापती ईश्वरीय विश्वविद्यालयात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रा चे आयोजन मिडिया विभाग, राजयोग शिक्षा आणि शोध प्रतिष्ठान, ब्रह्मकुमारीज माउंट अबू आणि ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या चर्चासत्रा मध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ शांतनू भाईजी, माउंट अबू, प्रा डॉ सोमनाथ वडनेरे, पत्रकार राजेश राजोरे, मार्गदर्शन करणार आहेत.
सायबर पत्रकारिता, डिजिटल तंत्रज्ञान, मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या गरजा या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
देऊळगाव राजा शहर व तालुक्यातील पत्रकारांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा यांनी केले आहे.