ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्घटना टाळा-चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा

महानगर भाजपाचे मनपाला निवेदन

चांदा ब्लास्ट

मुंबईत 13 मे 2024 विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली.अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर,चांद सैय्यद, रवी चाहरे,रुद्रनारायण तिवारी,पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती.

 पावडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये सुध्दा होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना होऊ शकतात.,म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे.

 मुंबई येथील घडलेली दुर्घटना अत्यन्त दुखदायी आहे.प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जवाबदार आहे.अनधिकृतपणे मुंबईत ते विशाल होर्डिंग लावण्यात आले.अशी स्थिती येथेही नाकारता येत नाही.करीता, शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जचे सर्व्हे करून ऑडीट करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये