ताज्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस एकविसावे मुख्यमंत्री म्हणुन पदारुढ – एकनाथ शिंदे व अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 19 राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांची शपथविधीसाठी आझाद मैदानावर हजेरी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा

महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांचेसह भाजप शासित 19 राज्याचे मुख्यमंत्री तसेच हजारो नागरिकांच्या साक्षीने झालेल्या दिमाखदार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस ह्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली असुन त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार ह्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचेकडून देण्यात आली.

मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर पार पडलेल्या भव्य शपथविधीसाठी विदर्भातील हजारो नागरिकांसह मुंबईकरांनी हजेरी लावली होती. आझाद मैदानावर दुपारपासूनच नागरिकांची रीघ बघायला मिळाली. शपथविधीसाठी महायुतीने जय्यत तयारी केली होती. हा सोहळा भव्य व दिमाखदार व्हावा ह्यासाठी कार्यक्रमस्थळी अजय अतुल सह विविध कलावंतांनी हजेरी लावुन रंगारंग कार्यक्रम सादर करून उपस्थित नागरिकांचे तसेच मान्यवरांचे मन जिंकले.

देवेंद्र फडणवीस ह्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असुन सलग तिन विधानसभा अस्तित्वात येताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते राज्यातील एकमेव नेते असुन त्यांनी वसंतराव नाईक ह्यांच्या तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली असुन वसंतराव नाईक ह्यांनी तब्बल 11 वर्षांहून अधिक काळ राज्याचे नेतृत्व केले तर शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होऊनही त्यांनी एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला नसुन देवेंद्र फडणवीस असे करणारे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री व काँग्रेसेतर पक्षांचे एकमेव मुख्यमंत्री आहेत मात्र राज्याचे सर्वात कमी काळ म्हणजेच अवघे 5 दिवस (3 दिवस मुख्यमंत्री व 2 दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री) सत्तेत राहण्याचा निचांकी विक्रम देखिल देवेंद्र फडणवीस ह्यांच्याच नावावर आहे हे विशेष.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये