ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस दल व सिमा सुरक्षा दलातर्फे रुट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच जनतेमध्ये पोलिसांविषयी आदरभाव व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता भारतीय सीमा सुरक्षा दल तसेच पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, पोलीस स्टेशन नागभीड, पोलीस स्टेशन शिंदेवाही,पोलीस स्टेशन तळोधी बाळापूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे सह आज दिनांक 4/11/2024 ला पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी वरून मौजा अरेर नवरगाव येथे रवाना होऊन तेथील बस स्टँड चौक पासून रूट मार्चला सुरुवात केली,बस स्टँड चौक, वरून बाजार चौक बाजार,चौकामधून दुर्गामाता चौक ,तेथून हनुमान मंदिर तलाव चौक,व शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवरगाव येथे रोड मार्च संपवून पुढे एक किलोमीटर असलेल्या पिंपळगाव भोसले गावामध्ये जाऊन, तेथे रूट मार्चला सुरुवात केली.

प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव भोसले येथून ग्रामपंचायत चौक, जे टू जी महाराज पुतळा चौक,शिवाजी महाराज पुतळा चौक, भोई समाज चौक पर्यंत जाऊन पिंपळगाव भोसले येथील रूटमार्च संपविला, तेथून सरकारी वाहनाने ब्रह्मपुरी येथे येऊन ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन पासून रूट मार्च ला सुरुवात केली, पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी वरून सराफा लाईन चौक, सराफा लाईन वरून,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,तेथून सावरकर चौक, फवारा चौक, शिवाजी महाराज चौक, ख्रिस्त आनंद चौक, झाशी राणी चौक, संत रविदास महाराज, चौक रेणुका माता चौक, आणि हमपिया मस्जिद चौक, भवानी माता मंदिर चौक, वरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे रूट मार्च समाप्त केला रूट मार्च मध्ये बीएसएफ ची तीन अधिकारी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, नागभीड व शिंदेवाही येथील एकूण ९ अधिकारी व 30 पोलीस अंमलदार हे रूटमार्चला हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये