ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरात २९ व ३० ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त दिनांक 29 रविवार व 30 सोमवार 2023 ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज देवस्थान समाधी वार्ड चंद्रपूर येथे पुण्यतिथी उत्सव आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमात श्रींची घटस्थापना, रांगोळी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, तसेच
यावर्षी नाभिक समाजाकडून दिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी नाभिक समाजातील भाविक बांधव, भगिनींनी श्री संत नगाजी महाराजांच्या शोभा यात्रेस रविवार दिनांक 29 ऑक्टोंबरला सायंकाळी चार वाजता निघणारा शोभा यात्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक 30 ऑक्टोबरला श्रीच्या मुर्तीचे अभिषेक, श्रींच्या पोथीचे पारायण, रक्तदान शिबिर, कार्यक्रम, दहीहांडी  आणि काला, प्रवचन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रीडा सांस्कृतिक, कला, आध्यात्मिक क्षेत्रातील, रांगोळी पाक कला स्पर्धेचे वितरण, कार्यक्रमाच्या अंती महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नाभिक समाज, भाविक भक्तांनी होणाऱ्या पुण्यतिथी उत्सवास आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान श्री संत नगाजी महाराज उत्सव समितीकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये