Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या हायवावर कारवाई

तालुक्यात येत आहे बाहेरची अवैद्य रेती : भद्रावती तहसीलदार ॲक्शन मोडवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

           भद्रावती येथील शिंदे पेट्रोल पंप जवळ अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या हायवा गाडीवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दिनांक 13 रोज शुक्रवारला पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली. हायवा गाडी क्रमांक 34 बी. जि. 6933 या क्रमांकाच्या गाडीतून चार ब्रास रेतीची वाहतूक करण्यात येत होती.

या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर तहसीलदार भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आशिष धर्माल, तलाठी दिनेश भिसेखर, कुशल मस्के यांनी कारवाई करीत सदर हवा ताब्यात घेतला. सदर हायवा चंद्रपूर येथील विठ्ठल रासेकर यांच्या मालकीचा असल्याचे कळते. सदर घटनेचा तपास भद्रावती महसूल विभाग करीत असून अवेद्य रेती व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये