ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘पसायदान ग्रुप तर्फे दिवाळीनिमित्त गरीब मुलांना व परिवारांना नवीन कपडे, मिठाई, फटाके वाटप कार्यक्रम’

चांदा ब्लास्ट

‘दिवाळी’ हा एक दुसऱ्यांना आनंद देण्याचा, घरोघरी दिवे लावून घरातील नकारात्मकरुपी अंधकारमय वातावरण दूर सारून एक सकारात्मकरुपी प्रकाशमय वातावरण तयार करण्याचा, एक दुसऱ्यांना मिठाई देऊन तोंड गोड करण्याचा आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्याचा ऊर्जेने ओतपोत भरलेला सण. आणि हा सण आपण आपल्या घरोघरी अति हर्शोऊल्लासाने साजरा करतोय. घरातील सर्व सदस्यांना नवीन कपडे, घराच्या सभोवताली रंगीबेरंगी प्रकाश माळा, विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या ठेवणीतल्या आणि चवीतल्या रंगीबेरंगी मिठाई, व फटाक्यांची आतिषबाजी…. अशा आनंदमय वातावरणात आपण दिवाळी सण साजरा करीत असतो. पण गोरगरिबाच्या मुलांना हे क्षण फार दुर्मिळ असतात. जर का या आनंद वातावरणात थोडेसे जरी आनंदाचे क्षण आपण अशा गोरगरिबांच्या मुलासोबत वाटून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्यास, ह्या आनंदाची अनुभूती काही वेगळीच असते व सगळ्यांचाच आनंद द्विगुणीत होतो. याच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पसायदान योगा ग्रुपच्या पुढाकाराने व पसायदान जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने हा एक मदतीचा हात पुढे करीत अभिनव उपक्रम राबविल्या गेला.

आपल्या सर्वांना माहीतच आहे की या दिवाळीच्या कालावधीत बाजारातील लोकांचा प्रतिसाद नेहमीच्या दिवाळीपेक्षा थोडा मंदावलेला दिसत आहे. मोठे-मोठे दुकानदारांना याचा फटका बसत आहे. पण रस्त्यावरील हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना याची झळ मात्र नक्कीच फार मोठी आहे. या सगळ्या प्रकारामुळे दिवाळीनिमित्त फुतपाथ वरील छोट्या विक्रेत्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यांच्याकडे चूल जळणेही कठीण झाले आहे त्यात दिवाळीच्या दिव्याची काय मिसाद. सर्वांनी बघितलेच आहे की नागपूर रोडवर कुंदन प्लाझा हॉटेलच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टेडी बियर बाहुल्या विक्रेत्याचे रस्त्याच्या फुटपाथवर स्टॉल्स लागलेले आहेत. त्यांची विक्री होत नसल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या घरी अंधकारमय वातावरण पसरलेले आहे व त्यांच्या लहान मुलांना गोड-धोड तर सोडाच पण दोन वेळच्या जेवण्याचीही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरंतर अशाच लोकांना सहकार्याची गरज आहे, आनंद देण्याची गरज आहे. विविध वयोगटातील मुले मुली मिळून जवळपास 18 व एकूण 6 परिवार आहेत.

‘पसायदान ग्रुप’ च्या सर्व महिला पुरुषांनी 12 नोव्हेंबर 2023 रोज रविवारला लक्ष्मीपूजनाचे निमित्य साधून सकाळी त्यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या तात्पुरती निर्मित मोडतोड झोपडी मध्ये राहत्या ठिकाणी जाऊन गरीब मुलांना व त्यांच्या परिवारांना मीठाई, नवीन कपडे व फटाके वाटप करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पसायदान जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष प्रकाश गुंडावार आणि पसायदान योगा ग्रुप च्या अध्यक्षा वनश्री केशव मेश्राम, अरविंद नगर चंद्रपूर यांनी अथक परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे ‘पसायदान ग्रुप’ च्या सर्व महिला पुरुषांनी आर्थिक सहकार्य करीत उस्फुर्तेने या उपक्रमात सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये