ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे होणार तालुका ‘पशुवैद्यकीय चिकित्सालय’

आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश: चिकित्सालयाच्या स्थापनेस शासनाची मंजुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कोरपना – येथील श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे तालुका सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालय मध्ये रूपांतर होणार आहे. या दृष्टीने हालचालीला वेग आला आहे.

या चिकित्सालयासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी पशुसंवर्धन, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे सातत्यपूर्ण मागणी करीत पाठपुरावा केला.त्यावर पशुसंवर्धन आयुक्तालयाने सदर प्रस्तावास मान्यता दिली असून लवकरच कोरपना येथिल श्रेणी एक दवाखाना तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात रूपांतरित होणार आहे. कोरपना परिसरातील शेतकरी व पशुपालकांच्या सोयीच्या दृष्टीने भोंगळे यांनी ही रास्त मागणी शासन दरबारी लावून धरली. शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोरपना तालुक्यातील पशुसंवर्धन सेवेला नवे बळ मिळणार आहे. हा निर्णय कोरपना तालुक्याच्या शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी मोलाचा असून पशुधन आरोग्यसेवा आता अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहे.

शासनाने राज्यातील १४८ तालुक्यांमध्ये तालुका स्तरावर ‘तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय’ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये कोरपना तालुक्याचा समावेश असून तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरपना येथे श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती तालुका निर्मिती पूर्वी १९८८ साली झाली होती. त्यानंतर ३७ वर्षांनी हा दवाखाना दर्जोनत्त होणार आहे. यासोबतच कोरपना येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे रिक्त पद भरण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही होणार असल्याची माहिती आहे.

यामुळे कोरपना तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांनी समाधान व्यक्त करीत आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये