ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चौकशीचा नावावर अत्याचार – संतोष गुप्ता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस चौकशी करण्याच्या नावाखाली अत्याचार करत असल्याचा आरोप मालू वस्त्र भंडार येथील पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा मुख्य संशियत आरोपी सूरज गुप्ता यांचे वडील संतोष गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

       संतोष गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या संपूर्ण कुटुंबाला 7 जुलैपासून दररोज सकाळी ते रात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेण्यात येत आहे. त्यामुळे आमची मानसिक स्थिती बिघडली आहे. तसेच पोलीस अत्याचार करत आहेत. सूरज गुप्ता आमच्या संपर्कात आहे असे पोलिसांना संशय आहे. त्याचा पत्ता विचारला जात आहे. मात्र गेल्या वर्षी उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तो निश्चितपणे काही दिवसांसाठी घरी आला होता, त्यानंतर त्याचा ठावठिकाणा किंवा आमच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मागमूस नाही. तपासात आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे.

सर्व आरोप निराधार आहेत:

पोलीस निरीक्षक यांना या बाबत विचारले असता त्यांनी म्हंटले की सर्व आरोप निराधार आहेत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे खोटे आरोप लावले जात आहेत. पोलिसांनी केवळ चौकशी केली आहे आणि संशयाच्या आधारे, पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करून तपास करणे हा पोलिसांचा अधिकार आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने पोलीस नियमांनुसार काटेकोरपणे तपास करत आहेत. आरोपी लवकरच पकडले जातील अशी आशा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये