ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोणतीही पूर्व सूचना न देता पोलिसांनी वाहतुकीचा मार्ग वळविला

बोंडेगव , काहाली,खंडाळा,खेड या गावाकडे जाणाऱ्या गावकऱ्यांना नाहक त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी : या वर्षी नव्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण परिसरात गणेश मूर्ती ची स्थापना करण्यात आली तसेच नगर परिषद पाणीपुरवठा पाण्याच्या टाकीचा बाजूला व ने. ही. शाळा परिसरात शहरातील मानाचे असे तीन मंडळाचे गणपती विराजमान असून त्यांचे मेला सुद्धा भरवला गेला आहे.

सदर मानाच्या तीनही गणेश मंडळाच्या परिसरात लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता व येथे वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये या करता पोलीस विभागातर्फे सायंकाळी 6 नंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, बोंडे गाव रस्त्यावरील ने ही महाविद्यालय जिम जवळ तसेच पोलीस क्वार्टर समोर बेरीकेटिंग करून सर्व वाहनांसाठी मार्ग बंद करण्यात येत आहे सायंकाळ नंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकातून काहाली, खेडकडे जाणारा मार्ग हा बंद करून तो गांधीनगर ग्रामीण रुग्णालय – मार्गे वळवण्यात आला आहे मात्र सदर चा मार्ग हा चारचाकी वाहन करता फार अडचणीचा असल्याने त्रास दायक ठरत आहे. काहली, खेड कडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांना झाशी राणी चौकातून कब्रस्थान मार्ग ग्रामीण रुग्णालया समोरून फेरा करून जावे लागत आहे.

सोबत बोंडेगाव वॉर्डातील रहिवाशांना शहरात ये जा करताना अगदी जवळचा मार्ग बंद राहत असल्याने तीन चार किमी अंतर जास्त पार करत कुर्झा मार्गे शहरात यावे लागत आहे. परंतु गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचे वाहने ही बिन्धास्त पणे सोडले जात आहेत.

सबंधित जवाबदार प्रशासनाने वाहतूक वळवीण्याची पूर्व सूचना देणारे फलक, कोणत्याही प्रकारची दवंडी देऊन किंवा पत्रकाद्वारे त्या भागातील नागरिकांना सूचना दिली नसल्यामुळे सायंकाळी 6 नंतर या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये