Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

समर्थ कृषी महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

           डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. अश्विनी जाधव, प्रा मोहजितसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.

महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. शिक्षणाच्या विश्वात महात्मा फुले यांचे योगदान, मुलींचे शिक्षण, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची शासनाने जबाबदारी उचलून समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच प्रा. अश्विनी जाधव व प्रा संदीप टेकाळे यांनी महात्मा फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋतुजा बनकर, तर आभार प्रदर्शन ऋतुजा वाघ ह्या विद्यार्थ्यांनीनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव, प्रा. नारायण बोडखे, व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये