माहीती आणि तंञज्ञानाच्या युगात अद्यावत राहण्यासाठी कार्यशाळांची आवश्यकता – कुलसचिव डाँ. अनिल हिरेखन
मूल येथे पार पडली महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
मूल : महाविद्यालयाचा महत्वाचा घटक असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संगणकीय युगात अद्यावत राहणे गरजेचे आहे. याकरीता प्रशिक्षणाची गरज असून कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संधी न गमावता कार्यशाळेत सहभागी होवून अद्यावत राहावे. असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. अनिल हिरेखन यांनी केले.
स्थानिक दुर्गा मंदीर सभागृह येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या सहकार्याने आयोजित विद्यापीठस्तरीय सुव्यवस्थापन व कौशल्य विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ. अनिल हिरेखन बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी म. रा. महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ बढे, सरचिटणीस डाॅ. सुजीत आर सिंह, संस्थेचे सचिव राजाबाळ संगीडवार, संस्थेचे अंकेक्षक सुनिल बल्लमवार, कर्मवीर महाविद्यालय मूलच्या प्राचार्य डाॅ. अनिता वाळके, संघटनेचे चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खोके, महासचिव अरूण जुनघरे आदि उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन नागपूर विभागीय सहसंचालक डाॅ. संतोष चव्हाण यांनी आभासी पध्दतीने केले. गोंडवाना विद्यापीठ गीता नंतर आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चंद्रमौली यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उद्घाटक सहसंचालक डाॅ. संतोष चव्हाण आणि बिजभाषक कुलसचिव डाॅ. अनिल हिरेखन यांनी भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात मोठया प्रमाणांत बदल होणार असून संभाव्य बदल लक्षात घेवून शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अद्यावत राहण्यासाठी प्रयत्नशील असावे.
असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाचा आरसा असल्याचे सांगीतले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन संजय पडोळे यांनी तर महासचिव अरूण जुनघरे यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या बौध्दीक सत्रात सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर कार्यालयातील प्रशासकिय अधिकारी शंकर बरगे यांनी कार्यशाळेत सहभागी शिक्षकेत्तर कर्मचा-यांना महाविद्यालयातील व्यवस्थापनात कार्यालयीन लिपीकांचे कार्ये व जबाबदारी या विषयावर तर नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय ब्रम्हपूरी येथील निवृत्त प्राचार्य डाॅ. नामदेव कोकोडे यांनी प्रयोगशाळा सहायक आणि प्रयोगशाळा परिचर यांची महाविद्यालयाच्या हितासाठी भूमीका या विषयावर उद्बोधन केले.
कार्यशाळेच्या तिस-या सत्रात आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील ग्रंथपाल डाॅ. संजय साबळे यांनी ग्रंथालयाच्या सुयोग्य व्यवस्थापनात ग्रंथालय लिपीक व ग्रंथालय परिचर यांची भूमीका या विषयावर मार्गदर्शन केले. बौध्दिक सञाचे संचलन संजय बुरांडे आणि हिना पांडे यांनी तर आभार पद्माकर सोयाम आणि सिमा कारमेघे यांनी मानले.
कार्यशाळेचा समारोप महासंघाचे राज्य अध्यक्ष राजा बढे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सरचिटणीस डाॅ. सुजीत सिंह, सचिव चंदर पांडे, दिलीप पवार, विनोद तोडनकर, उपाध्यक्ष गजानन काळे, प्रशांत रंदई, उमेश पाटील, प्रकाश चर्तुवेदी, सिनेट सदस्य सतिश पडोळे, अध्यक्ष मनोज जाधव, सचिव प्रविण पाणनट्टे, महासंघ प्रतिनिधी राममोहन ब्राडीया, पांडूरंग चौधरी, शुभम मासुरकर, विलास चुदरी, विशाल गौरकार, विनोद चोपावार, उमेश देशमुख आदि उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या अडीअडचणीवर विचार मंथन करण्यांत आले. समारोपीय कार्यक्रमाचे संचलन शुभकांत शेरकी यांनी तर उपस्थितांचे आभार विशाल गौरकार यांनी मानले.
कार्यशाळेत गोंडवाना विद्यापीठ अधिनस्त चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील तिनशेच्या वर शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदीप देशमुख, डाॅ. सचिन चौधरी, प्रा. संगानंद बागडे, किशोर वाकडे, रूपेश चिंचोळे, सागर येलट्टीवार, गिरीश डोंगरे, संदीप गेडाम, प्रा. सचिन वाकडे, प्रा. ओंकार चन्नावार, प्रा. रागीनी उमलवार, प्रा. रैना शेंडे, राजश्री बांबोळे, ईश्वर मोहुर्ले, गणेश गड्डमवार, नरेश अलाम, राहुल बोबाटे, हरीदास चचाणे, रामचंद्र सातक, सुरेश याल्लेवार आदिंनी सहकार्य केले.