ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु. येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुक येथे सन 2007 च्या वर्ग दहावीचा माजी विद्यार्थी मेळावा 3 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक माननीय श्री अरविंद भाऊ शिंगणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे संचालक श्री अशोक भाऊ कोटेच्या हे होते.

सर्वप्रथम श्री सरस्वती मातेचे पूजन व श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सर्व मान्यवरांचा विद्यार्थ्यातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी माननीय संचालक श्री अरविंद भाऊ शिंगणे यांचे मुख्य संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने प्राचार्य श्री सुरळीकर सर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी देवानंद वाघ यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री सुरळीकर सर यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परिचय व आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले त्यांच्या जुन्या आठवणी, शिकवण, शिक्षकांबद्दलच्या आठवणी शाळेच्या परिसरात घालवलेले क्षण याबद्दल त्यांनी अगदी मनःपूर्वक भावना व्यक्त केल्या या शाळेतून मिळालेल्या *संघाच्या शिकवणी मधून आमचे जीवन घडले असे प्रतिपादन शिवानंद घुगे पिंपळखुटा यांनी केले संघाच्या, शिस्तीतूनच जीवनाला शिस्त लागते असेही त्याने सांगितले.

याप्रसंगी पिंपळगाव बुद्रुक, जळगाव, गोंदनखेड पिंपळखुटा, आळंद व रोहना या गावातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार श्री मारोतीराव काकड, श्री कारभारी जी नागरे व शाळेचे माजी प्राचार्य श्री मांटे सर, श्री मुरकुट सर, श्री घुगे सर लिपिक श्री रामभाऊ डीघोळे तसेच शाळेतील सध्या कार्यरत असलेले श्री कंचोले सर, श्री शिवाजी मुंडे सर, श्री संदीप मुंडे सर, प्रा श्री टेकाळे सर, श्री देवानंद वाघ सर तसेच दीनदयाल विद्यालय दे राजा चे शारीरिक शिक्षक श्री राठोड सर उपस्थित होते. त्यानंतर श्री मांटे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. मुरकुटसर यांनीही विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले यात आई-वडिलांचे सेवा करा, निर्व्यसनी राहा असा संदेश दिला त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक श्री अशोक भाऊ कोटेच्या यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी 41 विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मान्यवर उपस्थित होते त्यांनी शाळेच्या विषयी कृतज्ञता म्हणून योगदान देण्याचे त्यांनी कबूल केले. कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला तसेच श्री सुरळीकर सर यांच्या तर्फे ही मिठाई देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये