ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनावराच्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा 

11 जनावरांची सुटका तर नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मेहबूब पुरा वार्ड नंबर 14 अवैध कत्तलखाना सुरू असल्याची तक्रार तेथील काही रहिवासी नागरिकांनी केली याची गंभीर दखल घेत देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाने आज भल्या पहाटे तेथून अकरा जनावरांची बेकायदेशीर रित्या डांबून जनावरांची सुटका करण्यात आली तसेच घटनास्थळावरून विविध साहित्य जप्त करून नऊ आरोपी विरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे

 सविस्तर वृत्त असे की शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मेहबूब पुरा वार्ड नंबर 14 येथे अवैधरित्या जनावरांचा कत्तलखाना चालू होता स्थानिक नागरिकांना भयंकर त्रास होत होता कत्तलखान्यातील मास तसेच सांडपाण्यामुळे सदर एरियामध्ये दुर्गंधीचे स्वरूप प्राप्त झाले होते अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी त्याची गंभीर दखल घेत आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान घटनास्थळावर सहकारी कर्मचाऱ्यांसोबत छापा मारला त्यांच्या समवेत नगरपालिकेतील कर्मचारी दोन सुशिक्षित पंच त्यांनी सोबत घेतले होते घटनेवेळी बारीक गल्लीत पंचा सह पोहोचले असता दहा फूट उंच सिमेंट विटांनी उभारलेल्या भिंतीच्या आत मध्ये ओट्यावर दोन इसम हे जनावरांची मास कापताना दिसून आले सदर ठिकाणी लाल रंगाचे गोवंश जनावरांचे मास वजन 80 किलो एकूण किंमत 80 हजार रुपये गोवंश मास कापण्या करता वापरण्यात येणारे लोखंडी सुरे एकूण सहा नग किंमत सहाशे रुपये तसेच जनावरांची कत्तल करण्यासाठी इतर साहित्य किंमत आठशे रुपये गोवंश विक्रीसाठी लागणारे साहित्य तीन हजार रुपये असे विविध प्रकारचे साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आणि तसेच तेथून 80 हजाराचे एकूण 11 विविध वर्णनांचे गोधन घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.

या घटनेतील आरोपी हे 15 15 फूट लांबी रुंदीच्या बंद तीन शेडमध्ये गाय गोरे वासरू निर्दयीपणे कत्तलीसाठी दाबून ठेवून त्यांची कत्तल करून त्यांचे गोमंच ताब्यात ठेवून ते विक्री करताना मिळून आले अशा प्रकारच्या सरकार पक्षातर्फे फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीचंद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख रहेस शेख शहाबुद्दीन कुरेशी क्रमांक दोन शेख आरिफ शेख हाशम क्रमांक तीन मोहम्मद साजिद मोहम्मद जाहीर अली क्रमांक चार मोहमंद जावेद मोहम्मद हुसेन क्रमांक पाच शेख मस्तक शेख दावल क्रमांक सहा शेख आरिफ शेख हमीद क्रमांक सात शेख इमरान शेख ताहेर क्रमांक आठ मोहम्मद हनीफ महमंद हुसेन क्रमांक नऊ शेख कासम शेख अमीर सर्व राहणार मेहबूब पुरा वार्ड नंबर 14 यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये तसेच विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आजच्या या कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, उपनिरीक्षक भारत चिरडे, तर पोलीस कर्मचारी गृह रक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये