Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजेचा धोका टाळण्यास महावितरण सज्ज

चोवीस तास संपर्कासाठी कंट्रोल रूम

चांदा ब्लास्ट

पावसाळ्यात विजेचा धोका लक्षात घेता या काळात वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगली तर होणारे वीज विघात टाळता येणे शक्य आहे असे आवाहन ‘महावितरण’ कडून करण्यात आले आहे. नागरिकांना संपर्क करण्यासाठी २४ तास कंट्रोल रूमची विशेष सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुपन, फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपांचा स्विच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधी कधी वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या व लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास वीज ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालयास अवगत करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणाऱ्या ‘महावितरण’ च्या चंद्रपूर जिल्ह्यातील सनियंत्रण कक्षातील – ७८७५७६११९५ व गडचिरोली जिल्ह्यातील सनियंत्रण कक्षातील – ७८७५००९३३८ हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे. वादळवारा व पावसामुळे येणाऱ्या आपत्तीसाठीच या क्रमांकावर संपर्क करावा. कोणत्याही कंपनीच्या लँडलाईन किंवा मोबाइलद्वारे या क्रमांकावर वीज ग्राहकांना माहिती देता येणार नाही. या सोबतच ‘महावितरण’ ने वीज ग्राहकांसाठी १९१२ / १९१२० / १८००२१२३४३५ / १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक दिले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये