ताज्या घडामोडी

25 वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या एस टी चालकांचा सपत्नीक सत्कार – स्वच्छ सुंदर बस व बस स्थानक स्पर्धेची केली सुरुवात

चंद्रपूर विभागीय आगारात 76 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागीय कार्यालयात देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन व डिजिटल मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया हे पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणे ह्यांनी भूषविले तर मंचावर उपस्थित विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे, विभा. कामगार अधिकारी पूनमवार, विभा. अभियंता मोडक, विभा. भांडार अधिकारी डहाके, व सहा. यंत्र अभियंता भगत ह्यांनी मंचाची शोभा वाढविली.

आपल्या प्रास्ताविकात पुरुषोत्तम व्यवहारे ह्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. ह्यावेळी चंद्रपूर विभागीय आगारात कार्यरत व निवृत्त चालकांपैकी ज्यांनी मागील 25 वर्ष विना अपघात सेवा दिली अशा चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ह्या सत्कार सोहळ्यात संजय घनशाम धोबे, वरोरा आगार, सतीश विधुजी खडसे, वसंत मधु राठोड, राजुरा आगार, अनिल देवराव घटे, विभा वाहतूक शाखा व प्रकाश महादेवराव फटिंग चंद्रपूर आगार ह्यांचा 25,000/- रुपये रोख, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व विना अपघात सेवा बॅच देऊन गौरव करण्यात आला

तर त्यांच्या सहचारिणीनिंना साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याकरिता महामंडळातर्फे विशेष मोफत प्रवास पास तसेच कार्यरत चालकांना ह्या कार्यक्रमाच्या कालावधीची हजेरी देण्यात आली.

अध्यक्षीय संबोधानात विभागीय नियंत्रक स्मिता सुतवने ह्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छ सुंदर बस व बस स्थानक ह्या नव्या स्पर्धेची माहिती देऊन विभागातील सर्व बस स्थानक व बसेस स्वच्छ, सुंदर तसेच त्यातून होणारा प्रवास आल्हाददायक करण्यासाठी नियोजन तसेच क्रियान्वयन करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे संचालन किरण नागपुरे ह्यांनी केले तर लता जोगी ह्यांनी उपस्थितांचे तसेच कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये