ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नगरवासियांच्यामदतीला धावले वनविकास महामंडळ

न.प.ची तत्परता कौतुकास्पद ; जनसामान्यांना मिळाला दिलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

स्थानिक प्रशासनाची तत्परता व शासकीय  विभागाचे सकारात्मक सहकार्य  गंभीर संकटातून जनसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकतो याची प्रचिती मूल शहरवासियांना आली.मूल न.प.प्रशासनाने दाखविलेली तत्परता व वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेत तेवढयाच तन्मयतेने केलेल्या सहकार्याने मूल शहरातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी घुसून होणाऱ्या मोठया क्षतीची व अनारोग्यापासून शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. भूतकाळात कधी नव्हे ते पूराचे संकट गतवषीं मूल शहरावर कोसळले होते. अचानक हा पाण्याचा  भयावह प्रवाह् आला कुठून यावर नगरपरिषद,सा.बा.विभाग,व वनविभागाने अभ्यास  केल्यानंतर सदर लोंढा वनविभाग व वन विकास महामंडळाच्या कर्मवीर महाविद्यालयाचे लगतच्याडोंगराळ भागातून आल्याचे चित्र आढळले. वनविभागाने बांधलेली टि.सी.एम.मुळे सदर पाण्याचा  मोठा लोंढा वनविकास महामंडळाच्या  जीर्ण टि.सि.एम.पारीतून  शहरात  येत असल्याने व या पाण्याचे नियोजन करणे अशक्य असल्याने वनविकास महामंडळाच्या हददीवरील पार नव्याने बांधणे अत्यावश्यक होती.पावसाळा तोंडावर,परवानगीची किचकट प्रक्रिया बघता याहीवषीं मोठे संकट बघून नगरवासीय धास्तावले. नगरपरिषद मुख्याधिकारी  अजय पाटणकर यांनी न.प.यंत्रणेमार्फत् सदर २५० ते ३०० मिटर लांब खोदकाम करून पाणी गावाबाहेर वळविण्याचा निर्णय घेतला व वनविकास महामंडळाकडे परवानगी मागितली. साधारणपणे वनविभागाकडून अशा परवानगी मिळण्याची  शक्यता धुसर अथवा किचकट असते.

मात्र या महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस.वाय.मरसकोल्हे यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेत लगेच ऐ.सि.एफ,आर.एफ.ओ,फारेस्टर यांना पाहणीकरीता पाठवून अहवाल मागविला.या सर्व अधिकाऱ्यांनी विलंब न लावता पाहणी करून आपापला अहवाल सादर करून विषयाची गंभीरता वरिष्टांना कळविली.विभागीय व्यवस्थापक एस.एम.मरसकोल्हे  यांनी स्वता पाहणी केली व त्वरीत काम करून शहरवासियांना दिलासा मिळावा याकरीता काम करणयासंबंधाने नगरपरिषदेला परवानगी दिली.नगरपरिषदेने सुदधा कुठलाही विलंब न करता लगेच कामाला सुरवात केली.सहा दिवसात हे काम पुणं करण्यासाठी न.प. निरीक्षक अभय चेपूरवार, वसंता मोहुर्ले यांनी सतत कामावर लक्ष ठेवले. वनविकास महामंडळाने निव्वळ परवानगी दिली नाही तर काम संपेपावेतो आर.एफ.ओ. एस.बी.बोथे, आर.जी.कुमरे वनपाल,यु.आर.गवई वनरक्षक यांनी सतत कामावर लक्ष ठेवून काम तांत्रिकदृष्टया व नियमानुसार करण्यास  मोठे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये