ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जिवती नगरपंचायतची धुरा!

नगराध्यक्ष कविता आडे यांची पदे भरण्याची मागणी - अनेक महत्वाची अनेक पदे रिक्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती नगरपंचायतची स्थापना १७ जुन २०१५ ला झाली. आता याच अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नगर पंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सध्या नगरपंचायतीचे कामकाज विस्कळित सुरू आहे. विविध विकासकामांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नागरिकांना दैनंदिन विविध नोंदींसह विविध दाखल्यांसाठी कार्यालयात तासन्‌तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. याला नगराध्यक्ष कविता आडे यांनी दुजोरा देत कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. 

राज्य शासनाच्या धोरणानुसार तालुका क्षेत्र म्हणून १७ जुन २०१५ रोजी जिवती ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले.माजी  मुख्याधिकारी यांची बदली झाल्यामुळे सध्या मुख्याधिकारापदाचा अतिरिक्त कार्यभार कोरपना तहसिलचे नायब तहसीलदार प्रवीण चिडे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, त्यांची कोरपना तहसिल व जिवती तहसिलसह नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळताना कसरत होताना दिसत आहे.

जिवती नगरपंचायतीत अनेक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना, सध्या निम्या कर्मचाऱ्यांवर नगर पंचायतीचा कारभार सुरु आहे. दर महिन्यात नगर पंचायतच्या मासिक सभेला मुख्याधिकारीसह अतिरिक्त प्रभार असलेले सर्वच विभाग प्रमुख अनुउपस्थित असतात, विभाग प्रमुख अनुउपस्थित असल्यामुळे याचा विकास कामावर परिणाम होत आहे. यात बांधकाम विभाग प्रमुख म्हणून क्रीष्णा धर्माधिकारी यांच्याकडे कोरपना येथे स्थायी नियुक्ती आहे, व विद्युत अभियंता म्हणून अमित निमकर यांच्याकडे गडचांदूर नगर परिषदेचा पदभार आहे तर संगणक अभियंता म्हणून प्रीतिश मगरे यांच्याकडे गडचांदूर नगर परिषदेचा स्थायी पदभार आहे व त्यांचा अतिरिक्त पदभार जिवती नगर पंचायतला आहे वरील सर्व विभाग प्रमुख कोणत्याही मासिक सभेला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे नगर पंचायत क्षेत्रातील विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. व बांधकाम विभागातील अनेक विकास कामे ही वनविभागाच्या परवानगी शिवाय होत नसल्याने एक ही अधिकारी पाठपुरावा करण्यास तयार नाही, तर पाणी पुरवठा विभागातील अनेक कामे ठप्प आहेत. मागील तीन वर्षांपासून सुरु असलेली सारंगापूर येथील पाणी पुरवठा योजना याच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अद्यापही सुरू झाली नाही. तर जिवती येथील पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपना मुळे बंद आहे. शहरात वाढीव विद्युत खांब अद्यापही मंजूर नाहीत व अस्तित्वात असलेल्या खांबावर दिवसरात्र लाईट सुरू असतात त्याकडे विद्युत अभियंत्याचे दुर्लक्ष होत आहे. शहरात मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे, कामामध्ये अडथळा निर्माण करणारे खांब हवण्यासाठी कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे मुख्य रस्त्याचे काम थांबले आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. विकास कामे, गोरगरिबांना घरकुले, व इतर कामे होत नसतील तर नगर पंचायत बरखास्त करून ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. जर भविष्यातील कोणत्याही सभेला अधिकारी व कर्मचारी अनुउपस्थित राहत नसेल, तर नगर पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी सर्व सत्ताधारी व विरोधक नगरसेविकानी दिला आहे. व नगर पंचयात स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत त्यात स्वछता निरीक्षक, गाळणी चालक, पंप ऑपरेटर, तारतंत्री, मुकादम, लेखापरीक्षक, स्थापत्य अभियंता, नगररचनाकार इत्यादी पदे रिक्त आहेत व इतर ही पदे अद्यापही भरली गेली नसल्यामुळे संबंधित विभागाचे कामकाज करताना अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासनाने नगरपंचायतीमध्ये या पदांची तत्काळ भरती करावी, अशी मागणी नगराध्यक्ष कविता आडे यांनी केली आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्यात नाल्या सफाई, सी सी रस्ते बनविणे, इत्यादी अनेक कामे होत असली, तरी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे नगरपंचायती मार्फत नवीन नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत सिमेंट काँक्रिटचे रस्ते, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त शहर आदी प्रमुख योजना राबवण्यात कायमस्वरूपी मुख्याधिकारी व  अधिकारी नसल्यामुळे अडचण येत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत.म्हणून नगरविकास विभागाने याची तातडीने दखल घेऊन कायम मुख्याधिकारी देण्यात यावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये