ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लमाण तांडा समृद्धी समितीच्या तालुका प्रमुख पदी नितेश बानोत यांची निवड

शासनातर्फे आयोजित एका बैठकीत करण्यात आली निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         ग्रामविकास विभागाअंतर्गत शासनातर्फे अशासकीय समित्यांच्या तीन वर्षांच्या निवड करण्यात आल्या असून या अंतर्गत संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी समितीच्या भद्रावती तालुका प्रमुख पदावर तालुक्यातील तांडा येथील बंजारा समाजाचे युवा नेते नितेश बानोत यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड शासनातर्फे आयोजित एका बैठकीत करण्यात आली.

या परिसरात समाजासाठी अगदी तत्परतेने काम करणारा सामाजिक कार्यकर्ता अशी नितेश बानोत यांची ओळख आहे. तांडा गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, तांडा गावाला महसुली गाव घोषित करणे व अन्य आवश्यक विकास कामे करणे हे सदर समिती समोर उद्दिष्टे आहेत. निवड झाल्याबद्दल नितेश बानोत यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये