दोन घराची घरफोडी करणाऱ्या आरोपीला नागपूर येथील न्यायदंडाधिकारी यांनी ठोकावला कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 20/9/2021 रोजी फिर्यादी नामे रमेश कृष्णराव डवरे वय 70 वर्ष राहणार जुना ज्ञानेश्वर नगर अजनी जिल्हा नागपूर यांनी पोलिस स्टेशन अजनी ला येवून रिपोर्ट दिली की रमेश डवरे आणि त्यांच्या पत्नी सह मुलांच्या भेटी करीता पुणे येथे गेले असता त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने फोन करून सांगितले की तुमच्या घराचे कुलूप तोडून टाकले आणि घरातील सामान व कपडे आणि वस्तू अस्ताव्यस्त पसरलेले दिसत आहे असे सांगितल्यावर फिर्यादी यांनी मुलाच्या मित्राला फोन करून सांगितले की माझ्या घरी जाऊन बघ की माझ्या घरी काय झाले आहे आणि मला सांग माझ्या मुलाच्या मित्रांनो सांगितले असता आम्ही 27/9/2021 रोजी घरी परत आलो असताना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने आलमारीची तपासणी केली असता सोने चांदीचे दागिने आणि नगदी 53,000/- रुपये नगदी लंपास केल्याचे दिसून आल्याने आम्ही पोलिस स्टेशन अजनी ला येवून रिपोर्ट दिली असता अपराध क्रमांक 575/2021 कलम 454,457,380,34 भादवी गुन्हा नोंद करण्यात आला यानंतर फिर्यादी नामे अमित मनोहर मोर्वे वय 36 वर्ष राहणार विणकर वसाहत यांनी अजनी पोलिस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की मुलांच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याकरीता गेलो असताना मी माझ्या घरी परतलो असताना माझ्या घराच्या दाराचे कुलूप तोडून दिसून आल्याने घराच्या आत घसुन बघितले असता आलमारी तोडून सोने चांदीचे दागिने आणि 30,700/- रुपये नगदी लंपास केल्याचे आढळून आल्याने आम्ही पोलिस स्टेशन अजनी ला जावून रिपोर्ट दिली असता अपराध क्रमांक 251/22 कलम 457,380,+34 गुन्हा दाखल करण्यात आला आणि यांचा तपास हेड कॉन्स्टेबल बंडू कंळबे यांच्या कडे तपास देण्यात आला आणि डवरे यांच्या तपास नायक पोलिस कॉन्स्टेबल सजनदास घरत पोलिस स्टेशन अजनी यांच्या कडे तपास देण्यात आला आणि दोन्ही केस मध्ये असलेले आरोपी यांच्या शोध करणे सुरू करण्यात आले असताना त्यांनी आरोपी शोध घेतला असून आरोपी शोध लावून आरोपीला अटक करण्यात आली आणि आरोपी नंबर (1) कौस्तुभ उर्फ बिट्टा अशोक वाघमारे राहणार कैलास नगर आरोपी नंबर (2) मंथन फुलझेले राहणार वाल्मिकी नगर आरोपी नंबर (3) अविनाश काळे राहणार कैलास नगर यांना ताब्यात घेऊन नागपूर येथे न्यायालयात हजर करण्यात आले.
नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री उपेंद्र पी.कुळकर्णी यांच्या न्यायालयात दोन्ही केस मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 380अंतर्गत गुन्हा करिता दोषी ठरवून 13 महिने सश्रम कारावास आणि 500/- रुपये दंड ठोठावला आहे 500/- रुपये दंड न भरल्यास 3 दिवस साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 454 गुन्हा अंतर्गत गुन्हा करीता दोषी ठरवून 13 महिने सश्रम कारावास आणि 500/-रुपये दंड ठोठावला आहे 500/- रुपये दंड न भरल्यास 3 दिवस साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे
या गुन्हा मध्ये पैरवी चे काम नायक पोलिस काॅन्सटेबल सुरेन्द्र लव्हाळे हेड नायक पोलिस कॉन्स्टेबल किर्ती फुकट आणि हेड कॉन्स्टेबल बंडू कंळबे यांनी काम पाहिले आहे यावेळी आरोपीचे वकील गजभिये यांनी काम पाहिले आहे यावेळी अर्जदाराच्या वतीने न्यायालयाचे सरकारी वकील समीर दुंगे यांनी काम केलेले असून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.