ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने जामगावात पोहोचली विद्युत रोषणाई.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत मौजा जामगाव हे अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल लोकवस्तीचे गाव. येथे मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करून जगणारे मोजकेच लोक राहतात. येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उजाळूनही विद्युतीकरण जोडणी न झाल्याने येथील रहिवासींना अंधारात रहावे लागत होते. स्थानिक नागरिकांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्याकडे विद्युतीकरणासाठी मागणी केली. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून आ. धोटे यांनी ३२ लक्ष रुपये निधी उपलब्ध केला आणि विद्युतीकरणाचे काम पुर्णत्वास आले. अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या या गावात विद्युत रोषणाई सुरू झाली. स्वातंत्र्यकाळापासुन दुर्लक्षित राहिलेले हे गाव आता प्रकाशनमान झाले असून स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे, गावकऱ्यांनी आ. सुभाष धोटे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.

या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, उपसरपंच बंडू तोडासे, माजी उपसरपंच फुलाबाई येडमे, विमलबाई कुडमेथे, सुरेश गेडाम, प्रदीप मालेकर, दौलत कुमरे, माजी उपसरपंच रामजी पेंदोर यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये