२७ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त युवा प्रेरणा संवाद व वेशभूषा कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित २७ मे रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे दुपारी १२ वाजता युवा प्रेरणा संवाद व वेशभूषा कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाने युवा पिढीने प्रेरणा घ्यावी या करिता या प्रेरणा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून श्री. सच्चिदानंदजी शेवडे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुलजी पावडे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार कीर्तिकुमारजी भांगडीया, आमदार श्री. देवरावजी भोंगळे, आमदार करणजी देवतळे, ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दी कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक डॉ. मंगेशजी गुलवाडे, महानगरचे संयोजक रामपालजी सिंह उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक व युवतींनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश देवकते व महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले आहे