ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद गडचांदूरचा अजब कारभार

एकच जावक नंबरवर दोन व्यक्तींना वेगवेगळे प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 भाजपचे शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी केली कारवाईची मागणी

नगर परिषद गडचांदूर कडून एकाच जावक क्रमांकाचा वापर करून दोन वेगवेगळ्या व्यक्तींना दोन वेगवेगळे नाहरकत प्रमाणपत्र व वाणिज्य प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत भारतीय जनता पार्टीचे गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद तुकाराम डोहे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिनांक १८ जून २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात डोहे यांनी नमूद केले की, नगर परिषद गडचांदूरने जावक क्रमांक आरो/नगप / ३९१/२०२५ दिनांक १७/०३/२०२५ अन्वये जावक बुकात श्री. तुळशीराम भिमा सिडाम – यांना स्विकृति पत्र दिल्याची नोंद आहे.परंतु त्याच जावक क्रमांकाचे नंबर टाकुन श्री. व्यंकटेश बालसनिवार – यांना दारू दुकाना करीता बोगस नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच दुसऱ्या जावक क्रमांक ( आरो/ नगप/३९१/१/२०२५) दिनांक १७/०३/२०२५ अन्वये जावक बुकात श्री तुळशीराम भिमा मडावी यांचे नावांनी देण्यात आलेला कार्यादेश अशी नोंद आहे. परंतु त्याच जावक क्रमांक टाकुन श्री व्यंकटेश बालसनिवार व इतर एक यांचे नावांनी बोगस वाणिज्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रकारावरून स्पष्ट होते की, नगर परिषदेतील संबंधित अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्रे तयार केले व जावक बुकातील जावक क्रमांकाचा वापर केला आहे. तरी सदर खोट्या बनावट प्रमाणपत्राचा वापर कुठल्या कामा करीता वापर करण्यात आला. सदर खोटे प्रमाणपत्र कुणी तयार केले. व यापूर्वी व आणखी नगर परिषद कडून असे किती बनावट प्रमाणपत्र देण्यात आले. यात काही आर्थिक व्यवहार झाला की काय ? याबद्दल सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी, बोगस प्रमाणपत्र रद्द करावी. अशी मागणी भाजपाचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांनी केली असुन मा जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये