जलसंवर्धना साठी लखमापूर शाळेचे विद्यार्थी एक पाऊल पुढे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथील विद्यार्थ्यांनी. मुद्रा व जलसंधारण विभाग तालुका कृषी विभाग कोरपणा पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन कसे करावे यासाठी. ८ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सर्वप्रथम प्रभात फेरी काढून, पथनाट्य च्या माध्यमातून नंतर विविध स्पर्धा घेऊन स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना जलसंवर्धन कसे करावे त्याचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दल चे महत्त्व त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून निबंधाच्या माध्यमातून आणि रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना जलसंवर्धनाचा संदेश दिला.
याप्रसंगी तालुका कृषी तज्ञ श्री राजेंद्र बावने यांनी सदरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यां सोबत हितगुज केले.
या कार्यक्रमात लखमापूर गावचे सरपंचश्री अरुण भाऊ जुमणाके शाळेचे मू अ श्री क्षीरसागर सर,सोबतच पाणलोट क्षेत्राचे श्री सचिव संदीप बावणे श्री राजुरकर श्री मोरेश्वर उरकुंडे, रोशन भोयर आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.