ताज्या घडामोडी

सोनार समाज बहुउद्देशिय संस्था शाखा राजुराने केली श्री भगवान विश्वकर्मा जयंत जल्लोषातसाजरी

जेष्ठ नागरिकांचाही केला सत्कार

चांदा ब्लास्ट शहर प्रतिनिधी

आशिष यमनुरवार राजुरा

दिनांक १७/०९/२०२३ ला सोनार समाज बहुउद्देशिय संस्था शाखा राजुरा जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित श्री भगवान विश्वकर्मा जयंती व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालय, राजुरा येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्हा सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रफुल चावरे, प्रकाश लुथडे, विलास लुथडे, दौलत गोरे, प्रविण जुमडे, प्रा. रामचंद्र यमनुरवार,भरत मुडे, ॲड. प्रशिष ताठे, संदीप चावरे, प्रविण घोडे, संजय पांढरे, शुभम उदापुरे, अंकित गजपुरे, सोनू चावरे, गजानन टिकले, अरूण बुटे, राकेश चीलकुलवार, ॲड. भास्कर सरोदे, राधा सरोदे, किर्ती काळे, गौरी सरोदे, प्रणिता जुमडे व शितल मस्के उपस्थित होते.

सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज व श्री भगवान विश्वकर्मा देवतांचा प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वालनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मनीषा राम पवार यांनी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज व श्री भगवान विश्वकर्मा यांचा जीवनावर संबोधन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा सचिव आशिष यमनुरवार यांनी केली.

त्यानंतर राजुरा शहरातील समाज बांधव जेष्ठ नागरिक भरत मुडे, प्रा. रामचंद्र यमनुरवार, पुरूषोत्तम मुजुमदार, प्रदिप विश्रोजवार, अरुण बुटे, चंद्रहास पांढरे, ओंकार शेरेकर, अशोक महेंद्रकर, विभा घ. पांढरे, सोनार समाजातील प्रथम माजी नगरसेवक राधेश्याम अडानीया, सोनार समाजातील पहिला एम. बि. बि. एस झालेल्या हृषिकेश मुजुमदार व सोनार समाजातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट सागर अडानीया यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा युवा अध्यक्ष प्रवीण घोडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश लुथडे, जिल्हा कार्यध्यक्ष ॲड. प्राशीश ताठे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. यमनुरवार, ज्येष्ठ मार्गदर्शक भरत मुडे, जिल्हा महिला अध्यक्ष राधा सरोदे व सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रफुल चावरे यांनी समाज बांधवांचे मार्गदर्शन केले व सांगितले की सर्व शाखेतील समाज बांधवांना एकत्र येऊन आपल्याला समाज कार्य करायचं आहे. यावेळी राजुरा शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाखेचे असंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल अडानिया, गजेंद्र शेरेकर, अशोक कलपल्लीवार, अमोल ताठे, संतोष भटपल्लीवार, दिपक लुथडे, पुकरा डावर, योगेश कुंदोजवार, मुक्तेश्वर मुजुमदार, राधेश्याम अडानिया, . विनायकराव कनकुलवार, भूषण पांढरे, प्रणिता पांढरे, मनीषा पवार, प्रियांका कलपल्लीवार, बूटे, विजया कनकुलवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सोनार समाज बहुउद्देशिय संस्था राजुरा शहर अध्यक्ष संदीप पांढरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये