ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचितांना आपल्या आनंदात सहभागी करणे ईश्वरीय कार्य – समीर देशमुख

रोव्हर्स-रेंजर्स चा वंचितांची दिवाळी उपक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘सामाजिक कार्याची आवड महाविद्यालयीन जीवनातच निर्माण झाली पाहिजे. गरीब व वंचित लोकांना पाहीजे तेव्हा मदत मिळाली पाहिजे. दिवाळीचा फराळ व कपड्यांचे पॅकेट्स वाटण्याचा उपक्रम प्रशंसनीय असून वंचितांना आपल्या आनंदात सहभागी करणे ईश्वरीय कार्य आहे.

असे प्रतिपादन युवा नेते तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर व रेंजर पथकाच्या वतीने आयोजित ‘वंचितांची दिवाळी’ उपक्रमाच्या समारोप प्रसंगी 14 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार सत्तार शेख, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले, रोव्हर लिडर संतोष तुरक, प्रा. जगदीश यावले व रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणेच यावर्षी रोव्हर्स व रेंजर्संनी दिवाळीचा फराळ व कपड्यांच्या 200 किट्स वाटप केल्या. कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 55 रोव्हर्स व रेंजर्संनी आपापल्या घरचा दिवाळीचा फराळ व भेट वस्तू वंचितांना देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली.

यशस्वीतेकरीता रोव्हर मेट योगेश आदमने, संकेत हिवंज, आसीफ शेख, अक्षय जबडे, शेखर भोगेकर, रेंजर राखी खोडे, वैष्णवी शिरभाते, नैना गवळी, प्रशिल अंदुरकर, साहील रामगडे, आदित्य तामगाडगे, कोमल शितळे, सुप्रिया यादव, भाविक आखूड, माहेश्वरी इंगोले व रोव्हर्स-रेंजर्स नी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये