ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जबरानज्योत धारकांचा व आशा वर्कर गट गटप्रवृतक यांचा देशव्यापी आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                   नुकतेच अखिल भारतीय किसान सभा व आशा वर्कर गटप्रवरतक यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता  या मोर्चाचे नेतृत्व कॉमरेड रवींद्र उमाटे राज्य कौन्सिलर महाराष्ट्र राज्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर. कॉमरेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर. कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भद्रावती. कॉमरेड ए के कॅप्टन कामगार नेते आयटक भद्रावती. कॉमरेड निकिता निर जिल्हा सचिव आशा वर्कर गट प्रवरतक यांनी केले

  गेल्या दीड महिन्या पासून जिल्हा अधिकारी कर्यालया समोर बसून ठिय्या आंदोलन करीत आहे तसेच दहा बारा दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे च्याळीस ते पन्नास हजार आशा वर्कर गट प्रवरतक कॉमरेड राजू देसले व कॉमरेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे

आदिवासींचे जल. जंगल. जमिनीच्या अधिकारासाठी इंग्रज सरकार विरुद्ध लढा दिला गमिनी कावा करून इंग्रजांना जेरीस आणले आज आदिवासींना अतिक्रमित जमिनीवरून बेदखल केले जात आहे वनाधिकार कायदा 2006 – 08 तयार झाला आहे या कायद्यानुसार 13 डिसेंबर 2005 रोजीच्या पूर्वीपासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आदिवासींनी दोन पिढ्याचा पुरावे व अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास आणि इतर गैर आदिवासी परंतु पारंपरिक वन निवासिनी 13 डिसेंबर 2005 रोजिच्या पूर्वीच्या अतिक्रमणाचा पुरावा परंतु त्यांच्या तीन पिढ्या पासून म्हणजे 1930 पूर्वी पासून त्यांच्या तीन पिढ्यानचे वास्तव व्य त्या गावात असल्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना 5 ते 10 ऐकर अतिक्रमित जमीन वाहिती करिता मिळते परंतु वनहक्क दावे धारकांच्या मार्गात वनविभागा द्वारे अनेक अडथळे निर्माण केले जात आहे या विरोधात संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय ट्रेड युनियन च्या वतीने दिनाक 16 फरवरी ला देशव्यापी आंदोलन ला पाठिंबा देवून भव्य मोर्चा जिलाधिकारी कार्यालय येथे 11 – 00 वाजता डॉ आंबेडकर चौक चंद्रपूर येथून काढण्यात येऊन जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

या मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये