ताज्या घडामोडी

प्रा. महेश पानसे अभीष्ट चिंतन व गौरव सोहळा ̊थाटात संपन्न

कार्यशील व्यक्तिमत्त झाले गौरवांकित

चांदा ब्लास्ट -मूल

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष,जेष्ट पत्रकार प्रा.महेश पानसे यांचे जन्मदिनी अभीष्ट चिंतन व याचे औचित्य साधून कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळा
दि.३ फेब्रु. २०२४ ला राज्य पत्रकार
संघ मुंबई तालुका शाखा मूल तर्फे थाटात संपन्न झाला.

राज्यात पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प़ा.महेश पानसे यांचा वाढदिवस दरवषीं चंदपूर, गडचिरोली, नागपूर ,भंडारा जिल्हयातील तालु का शाखांतफै वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून
साजरा करण्यात येत असतो.मूल तालुका संघाने यंदा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे यजमानपद स्विकारून
विवीध सामाजिक उपक्रमातून हा
सोहळा साजरा केला.

सकाळी ११ वाजता स्थानिक उप जिल्हा रुग्णालयात ८० रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी
एफ.डि.सि.एम. चे आर.एफ.ओ.सारंग बोधे, श्री.गवई उपस्थित होते.उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डा. यावेळी उपस्थित होते.

अभीष्ट चिंतन व गौरव सोहळा दुपारी २ वाजता
साजरा करण्यात आला. यात चंदपूर, गडचिरोली, नागपूर,वर्धा जिल्यातील व मूल परिसरातील १०० पत्रकार व शुभेच्छुकांनी उपस्थित होऊन शुभेच्छा
दिल्यात. प़ा.महेश पानसे व सौ.सुषमा पानसे यांचे हस्ते केक कापून सर्वांनी शुभेच्छां दिल्यात.

मूल चे तहसिलदार
रविन्द्र होळी यांना. ” सेवाव़ती”, सा.बा. उपविभाग मूल चे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांना ” सेवारन”,मूल चे ठाणेदार सुमित परतेकी यांना” जनसेवक” नवभारत क.वि.महाविद्यालयाचे
प्राचार्य अशोक झाडें याना ” शिक्षक रत्न” वरोरा येथील जेष्ट पत्रकार बाळूभाऊ भोयर याना”पत्रकार भुषण” राजुरी स्टील अँड अलाय इंडिया चे उपाध्यक्ष
सुमित खेमका याना ” उदयोग रत्न” युवा सामाजिक कार्यकर्ता रुपेश पाटील यांचा विशेष सन्मानाने
सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास विशेष उपस्थितीत राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष

अनुपकुमार भार्गव,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, गडचिरोली जिल्हाधक्ष रूपराज वाकोडे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे उपस्थित होते.यावेळी चंदपूर जिल्यातील सवं तालुकाध्यक्ष यांचाही
सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाच्या पत्रकार तुलेश्वरी बालपांडे यांना गौरवमुतींचे हस्ते विशेष सन्मानाने गौरवांकित करण्यात आले. या दिमाखदार सोहळाळ्याचे अध्यक्षपद संघटनेचे जिल्हा अध्यक्ष
जितेंद्र चोरडिया यांनी भूषविले.सायंकाळी सर्व पदाधिकारी यांचे
उपस्थितीत राजूरी स्टिल अँड अलायु इंडिया कंपनी चे आवारात विवीध वुक्षांचे रोपण पत्रकार संघातफै करण्यित आले. यावेळी कंपनीचे
जनरल मॅनेजर मनीष रक्षमवार, कंपनीचे उपाध्यक्ष सुमित खेमका
उपस्थित होते.
या दिमाखदार सोहळ्याचे संचालन तुलेस्वरी
बालपांडे यांनी तर आभारमत पत्रकार
राजू सुत्रपवार यांनी केले.
राज्य पत्रकार. संघाचे जिल्हा
पदाधिकारी मनिष रक्षमवार, मूल तालुका अध्यक्ष सतिष राजूरवार ,राजेंद्र वाढई, धर्मा सूत्रपवार,राजू सूत्रपवार,राजेंद्र कन्नमवार,मंगेश नागोशे, विवेक i̊n̊ दुयौधन, वसंता आडे,संतोष नावडे,
यांनी सदर सोहळासाठी पुढाकार घेतला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये