Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

मंडळाधिकारी प्रकाश सुर्वेची धडक कारवाई

एकाच वेळी रेती ने भरलेली दोन हयावा ट्रक वर केली कारवाई

चांदा ब्लास्ट –

बल्लारपूर :-बल्लारपूर तहसील मध्ये गोंडपिपरी वरून आलेले मंडळ अधिकारी येथील चार्ज घेताच तालुक्यातील रेती, मुरूम खनिज संप्पती अवेद्ध तस्करावर धडक कारवाई राबविलेली आहे आता पर्यंत लाखो रुपयाचा महसूल जप्ती कारवाई करून ट्रक, ट्रॅक्टर वर दंड आकारून शासन जमा करण्यात आले.दि,5 फरवरी रोजी सायंकाळी चा सुमारास खबरी द्वारे माहिती मिळाली की आकसापूर हुन रेती ने भरलेली हयावा ट्रक ये जा करीत असते अशी माहिती असतानाबल्लारपूर तहसील मधील मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे व कोठारीचे मंडळ अधिकारी सुजित चौधरी यांनी आमडी गावाजवळ दोन हयावा ट्रक ला अडऊन माहिती घेतली असता कागदपत्रे( टीपी )बरोबर नसल्याने दोन्ही हयावा ट्रक क्र, mh -34-BG -1627व mh -34-BZ -0221 तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. हे ट्रक कोरपणा येथील सद्दाम यांचे मालकीचे असल्याचे समजले. ट्रक मालक सद्दाम विविध कारणे सांगून ट्रक सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. बल्लारपूर तालुक्यातील रेती तस्कर मध्ये मंडळ अधिकारी च्या कारवाई मुळे दहशत निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये