Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वृक्षारोपण करून ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील होमगार्ड कार्यालय परिसरामध्ये ध्वजारोहण करून, स्वच्छता अभियान राबवून व वृक्षारोपण करून तसेच शहरात होमगार्ड यांनी प्रभात फेरी काढून ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला.तालुका समादेशक ॲड आर बी रामाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले

     होमगार्ड वर्धापन दिनानिमित्तकार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले व सर्व होमगार्ड यांनी वृक्षारोपण केले . तालुका समादेशक एडवोकेट रामाने यांनी होमगार्ड कार्यालयासमोर ध्वजारोहण केले यानंतर होमगार्ड यांच्या प्रभात फेरीला हिरवी झेंढी दाखवून फेरी सुरुवात केली.यावेळेस तालुका होमगार्ड समादेशक ॲड अर बी रामाने, फलटण नायक -ए बी सानप, बी पी जाधव , एन एस खांडेभराड,अंकुश झिने, सुनील झिने, पंडित सोळंकी, गोपीनाथ जाधव, ज्ञानेश्वर जायभाये, शिवाजी कुडके, रमेश मुंडे, जगन नागरे,कारभारी खांडेभराड, संतोष काकडे, विनोद खंडागळे, भानुदास काकड, समाधान खारडे, दत्तात्रय पऱ्हाड, अमरसिंग इंगळे,अंबादास मतकर,अंकुश कदम, रोहिदास डोंगरे, महिला होमगार्ड वडकर मॅडम, खिल्लारे मॅडम, खरात मॅडम, देशमुख मॅडम, साळवे मॅडम, भीमराव जाधव, पिंपळे व तालुक्यातील महिला पुरुष होमगार्ड यांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये